पीएनजी ज्वेलर्सचा ‘स्वर्ण स्वराज’ : अर्थप्रवाहाशी जोडणारा राष्ट्रहिताचा उपक्रम

 

कोल्हापूर : १८३२ साली सुरू झालेल्या पीएनजी ज्वेलर्सने ‘स्वर्ण स्वराज’ या राष्ट्रहिताच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. देशातील घराघरांत साठवून ठेवलेले निष्क्रिय सोने पुन्हा अर्थचक्रात आणणे, सोन्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे आणि अधिक जबाबदार पद्धतीने सोन्याचा वापर व खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.हा उपक्रम म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना सोन्याच्या खरेदीत संयम बाळगण्याचे केलेले आवाहन स्वीकारत, राष्ट्रहिताच्या भावनेतून पीएनजी ज्वेलर्सने दिलेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद केवळ एका व्यवसायाचा नसून, तब्बल १९४ वर्षांपासून भारतीय कुटुंबांशी संस्थेने जोडलेल्या नात्याचा आहे.या १९४ वर्षांच्या प्रवासात पीएनजी ज्वेलर्सने महामंदी, दोन महायुद्धे, स्वातंत्र्यलढा, फाळणी आणि जागतिक महामारी यांसारख्या अनेक ऐतिहासिक टप्प्यांमध्ये देशासोबत वाटचाल केली आहे. ग्राहकांशी असलेली पीएनजी ज्वेलर्सची नाळ ही केवळ व्यवहारांवर आधारित नसून अनेक पिढ्यांपासून जपलेल्या विश्वासाची आहे. ‘स्वर्ण स्वराज’ हाच त्या विश्वासाचा विस्तार आहे.भारतीय घरांमध्ये साठवलेले अंदाजे २५,००० टनांहून अधिक सोने आजही देशाची एक मोठी संपत्ती आहे. मात्र त्यातील मोठा हिस्सा लॉकर, तिजोरी आणि वारशातील दागिन्यांमध्ये बंदिस्त राहिला आहे. सोन्याची चमक कमी झालेली नाही; पण देशाच्या अर्थव्यवस्थेकडे जाणारा त्याचा प्रवाह थांबला आहे. याच सोन्याला पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी ‘स्वर्ण स्वराज’ उपक्रम पीएनजी ज्वेलर्स राबवत आहे.

 

 

 

 

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!