जीवनात आई वडील व गुरुजनांचे महत्वाचे स्थान:आ.सतेज पाटील 

 

कोल्हापूर: प्राथमिकशिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर आयोजित राष्ट्र सेवादल यांच्या सहकार्याने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी स्काऊटगाईड कॅम्प, सोनतळी, पन्हाळा रोड, कोल्हापूर येथे सुरु असलेल्याव्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराच्या दुसऱ्या दिवशी सभापती सौ.वनिता देठे यांचे प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षण समिती,म.न.पा. कोल्हापूरचे माजी प्रशासनाधिकारी श्री. विश्वास सुतारयांच्या शुभहस्ते घ्वजारोहण करुन सकाळचे सत्रातील दिनक्रमाससुरवात करणेत आली.  
    शिबीराचे ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांना आपले आरोग्य चांगलेकसे ठेवता येईल या विषयी श्री. धनश्याम भाई यांनी बहूमोल असेमार्गदर्शन करुन योगासनाच्या प्रात्यक्षिकासह विविध योगमुद्रा वत्याचे फायदे सांगितले. त्यानंतर शिबीरास आमदार सतेज उर्फ बंटीडी. पाटील यांनी भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीवनातआई वडीलांचे व गुरुजनांचे स्थान अत्यंत महत्वाचे असून त्यांनाकधीही विसरु नका व त्यांचा आदर करा व ध्येय सिध्दीसाठी भरपूरअभ्यास करा असा मौलिक संदेश त्यांनी दिला. बौध्दिक कार्यक्रमातश्री. कृष्णात पिंगळे, डी.वाय.एस.पी. यांनी «मी कसा घडलो¬ याविषयी बहूमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवादसाधत भावी आयुष्यामध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याक्षेत्रात उत्कृष्ट कामगीरी करुन यशाच्या अत्युच्च शिखरावर कसेजाता येईल त्याचा कानमंत्र दिला. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अवांतरवाचनावर भर देणेस सांगितले. त्याला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाददिला. सदर प्रसंगी श्री. भरत रसाळे, श्री. समीर घोरपडे, श्री. रंगनाथरावळ, श्री. अब्दूलकादर नदाफ श्री. प्रताप कोळेकर यांनी शिबीरठिकाणी भेटी दिल्या. तसेच विविध आकार व रेषा पासून चित्र कसेकाढता येते या विषयी रा.ना.सामाणी विद्यालय कडील सहा. शिक्षकश्री. दस्तगिर मुजावर यांनी प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना चित्रकलेचेधडे दिले.
    दुपारचे सत्रात श्री. द्वारकानाथ भोसले यांनी प्रात्यक्षिकासहविविध हस्तकला विद्यार्थ्यांकरवी तयार करुन घेतल्या. चहापानानंतरकोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर कडील अग्निशमनविभागाकडील कर्मचाऱ्यांनी आग लागलेनंतर कोणत्या प्रकारेकाळजी घेवून आग आटोक्यात आणता येवू शकते या बाबतचेप्रात्यक्षिके सादर केले. आजच्या आधुनिक जगात मोबाईल गेम, टॅब,नेट अशा यांत्रिकी वस्तुंचा वापर करुन आजची पिढी मनोरंजनाचेआभासी जगात रममाण होत आहेत यामूळे पारंपारिक खेळ लोपपावत आहेत असे चित्र सद्या पहावयास मिळत आहे. तरी पूर्वापारखेळ विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत त्या खेळाचे फायदे समजावेतयाकरिता छोटे खेळ या उपक्रमातून रिंग, दोरी उडी, गोट्या, विटीदांडू, क्रिकेट, गलोली या सारखे खेळ विद्यार्थ्यांना शिबीराचे ठिकाणीउपलब्ध करुन देणेत आले होते. पथनाट्य उपक्रमाच्या माधमातूनविद्यार्थी निर्मित पथनाट्य सादरीकरण करणेत आले. 
    सदर व्यक्तिमत्व विकास शिबीरास समाजाच्या सर्व स्तरातूनहातभार लागला त्यामध्ये प्राथमिक शिक्षण समितीम.न.पा.कोल्हापूर शाळांकडील सेवक कर्मचाऱ्यांनी चहापानावेळीबिस्किट पुडयांचे वाटप केले. तसेच निलोफर आजरेकर वआजरेकर फौंडेशन यांचे मार्फत शिबीर कालावधीसाठी आवश्यकअसणारा उत्तम दर्जाचा भाजीपाला पुरवठा, संजय मोहिते, तौफिकमुल्लाणी, दिलीप पोवार, मधूकर रामाणे, दुर्वास कदम यांनी नाष्टा वभोजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!