
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मेरी वेदर ग्राऊंड व बिंदू चौक येथे महिला व बालकल्याण समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्वयंचलित ई-टॉयलेटचे आज आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर सौ.स्वाती यवलुजे होत्या.
बेंगलुरू व चेन्नई या शहरांचे धर्तीवर ही ई-टॉयलेट उभारण्यात आली आहेत. याकरिता महिला व बालकल्याण समितीच्या निधीतून विशेष सुविधा देणेअंतर्गत रु.24 लाखाची तरतुद करण्यात आली होती. सदरची ई-टॉयलेट ताराराणी गार्डन, रूईकर कॉलनी, मेरी वेदर ग्राउंड व बिंदू चौक पार्कींग येथे बसविण्यात आली आहेत. सदरची ई-टॉयलेट अंत्यत टीकाऊ, स्वयंचलित व पर्यावरणपूरक आहेत.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती सौ.छाया पोवार, नगरसेवक अर्जुन माने, अशोक जाधव, मोहन सालपे, डॉ.संदीप नेजदार, लाला भोसले, नगरसेविका सौ.हसिना फरास, ऍ़ड.सुरमंजिरी लाटकर, सौ.शमा मुल्ला, उपायुक्त मंगेश शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, उपशहर अभियंता हर्षजित घाडगे, आनंद माने, माजी नगरसेवक आदील फरास, सामाजिक कार्यकर्ते गणी आजरेकर, शिवानंद बनछोडे, आशपाक आजरेकर, निवास वाघमारे, बाबा देशपांडे, जमील अथणीकर, महेश बेडेकर, मिलिंद देसाई, महेश पाटील, मिलिंद पाटील, स्वप्निल शेवडे, रोहित लाड, जॉनी यादव आदी उपस्थित होते.
Leave a Reply