गोकुळ निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार: आ. चंद्रकांत पाटील

 

कोल्हापूर: आज कोल्हापूर येथे गोकुळ दूध संघाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा -शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्व घटक पक्षांचे एकमत झाले.बैठकीदरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य देण्यावर चर्चा झाली. तसेच जिल्ह्यातील सर्व स्थानिक संस्था व कार्यकर्त्यांची ताकद एकत्र आणून आगामी प्रचाराची रणनीती आखण्याचा निर्धार करण्यात आला.या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडीक, जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समीत कदम, यांच्यासह महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

 

📍

Comments are closed.

error: Content is protected !!