कोल्हापूर: कोल्हापूर आणि राजेश क्षीरसागर हे एक समीकरण आहे. नेत्यांच्या मनातलं ओळखून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. मला कधी सांगावे लागले नाही गेली ४० वर्षे काम करत असताना वेळोवेळी पक्षाकडून आलेले आदेश पाळत काही वेळा सरकारच्या विरोधात देखील मी भूमिका घेतलेली आहे. पक्षासाठी कोणतीही तडजोड न करता सातत्याने लढत राहिलो. शिवसेनेला बळ देण्याचे काम केले.२०२२ ला फुटफुटी वेळी जिल्ह्यात शिवसेना एकसंघ ठेवली. संघटनात्मक जबाबदारी पार पाडलेली आहे. जनाधार वाढवण्यासाठी मी राज्यभर दौरे करत आहे. कार्यकर्त्यांच मला बळ मिळत आहे आता मला राज्यासाठी काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे.
मी एक कडवट शिवसैनिक आहे. आणि इतकी वर्ष या क्षेत्रात मी काम केल्यामुळे कोणताही आर्थिक फायदा न घेता एक जबाबदारीचे काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा मी नेहमीच करत आहे.
कोल्हापूरचा सर्वांगीण विकास व्हावा हेच ध्येय ठेवत शाहू मील चौकामध्ये शाहू मिलच्या जागेत भक्तनिवास आणि पार्किंग तसेच शाहू मिल पर्यंत भुयारी मार्ग आणि शामूल पासून युनिव्हर्सिटी पर्यंत ओवर ब्रिज यामुळे कोल्हापुरातील सर्व ट्रॅफिक ची समस्या कायमस्वरूपी मिटणार आहे अशी योजना करण्याचा मानस पुढील भविष्यात आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारां समोर मांडला.
