सोलापूर : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने सोलापूर शहरात वेग घेतला असून विविध शिक्षक संघटना, शिक्षक नेते आणि शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांना पाठिंबा व्यक्त केला जात आहे. शिक्षकांचे प्रश्न, न्याय्य हक्क आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कौस्तुभ गावडे यांच्या नेतृत्वाला बळ देण्याचा निर्धार शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे.सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन श्री. कैलास देशमुख सर आणि संचालक श्री. भीमानवरु सर यांनी कौस्तुभ गावडे यांना सोलापूर जिल्ह्यातून आघाडी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करण्याची भूमिका घेणाऱ्या उमेदवाराला पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. गणेश तडका सर आणि सचिव श्री. मुकुंद मोरे यांनी शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी कौस्तुभ गावडे यांना संघटनेचा पाठिंबा जाहीर केला. कला अध्यापकांसह शिक्षकवर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत प्रभावी आवाज आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.जिजामाता प्रशाला, कोंडीचे मुख्याध्यापक आणि शिक्षक नेते श्री. उदय जाधव सर यांनी तीस-तीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात सेवा केलेल्या शेकडो शिक्षकांचे आशीर्वाद कौस्तुभ गावडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दीर्घकाळ विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या अपेक्षा आणि समस्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडल्या जाव्यात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याचबरोबर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, मोहरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, गुरुकुल शिक्षण संस्था, रामराज्य शिक्षण संस्था याही संस्थानी शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना जाहीर पाठिंबा देऊन विजयी करण्याचे आश्वासन दिले. सोलापूर शहरातील या प्रचार मोहिमेतून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवा-सुरक्षा, जुनी पेन्शन योजना, नियमित शिक्षक भरती, अनुदानाचे प्रश्न आणि शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर प्रभावी पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विविध शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांकडून मिळणारा पाठिंबा कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ देणारा ठरत आहे.शिक्षकांचे प्रश्न केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळावे, या भावनेतून सोलापूरमध्ये प्रचाराची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने उभे राहण्याचा संदेश देत कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराने सोलापूरच्या शिक्षक वर्तुळात लक्ष वेधून घेतले आहे.
