शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडेच पसंतीक्रमांक १ चे उमेदवार

 

कोल्हापूर : शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राचा बुलंद आवाज विधान परिषदेत पोहोचविण्यासाठी भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे उमेदवार असल्याचे चित्र दिसून येत आहे.महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत साळुंखे कुटुंबीयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला आदर्श, जपलेली शैक्षणिक मूल्ये आणि समाजाभिमुख कार्याचा वसा व वारसा कौस्तुभ गावडे पुढे घेऊन जात आहेत. शिक्षकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम आणि अभ्यासू प्रतिनिधी विधान परिषदेत जाणे आवश्यक आहे. कौस्तुभ गावडे हे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी निश्चितच प्रभावी पाठपुरावा करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी शिक्षक मतदारांचे कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत असणार आहे.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील विविध आव्हाने आणि शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी ठामपणे भूमिका घेणारे युवा नेतृत्व विधान परिषदेत असावे अशी भावना शिक्षकांमध्ये निर्माण होत आहे..

 

Comments are closed.

error: Content is protected !!