चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं

 

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर अश्रू आणि श्रद्धेने नतमस्तक होत साकडे घातले. गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली, सत्तेची गणितं बदलली. आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमन करण्याचा शब्द दिला होता. गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारली. त्यामुळे गोकुळला उजिर्तावस्था मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लया त्यांच्या रक्ताचा वारसदार शशिकांत पाटील-चुयेकर यांना न्याय मिळावा, अशी भावना चुये ग्रामस्थांनी व्यक्त केली. पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील सचिन सर्जेराव पाटील या कार्यकर्त्याने कुशिरे ते थेट श्री अंबाबाई मंदिरापर्यंत तब्बल २५ किलोमीटरचा दंडवत घातला. तर दुसरीकडे, गोकुळ शिरगाव येथील स्व. चुयेकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या दूध उत्पादकांनी पुष्पहार अर्पण करताना अभिवादन केले.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!