कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या चेअरमनपदी माजी आमदार श्री. राजेश नरसिंगराव पाटील यांची बहुमताने निवड झाली. अध्यासी अधिकारी तथा विभागीय अधिकारी करवीर उपविभाग करवीर श्रीमती मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली सभेत ही निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्यानिवडीकरीता सुचक म्हणून – श्री. अजित शशिकांत नरके व अनुमोदक म्हणून – श्री. चेतन अरुण नरके आहेत.
यावेळी अध्यासी अधिकारी तथा विभागीय अधिकारी करवीर उपविभाग करवीर श्रीमती मोसमी चौगुले, करवीर तहसीलदार स्वप्निल पवार, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर प्रेम राठोड, संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, विरेंद्र मंडलिक, राहुल पाटील (सडोलीकर), चेतन नरके, अंबरिषसिंह घाटगे, अजित नरके, किसन चौगले, मदन देसाई, रणजितसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, रणजितसिंह कृ.पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, अजित पाटील, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, राजूबाबा आवळे, शशिकांत खोत, बयाजी शेळके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.भाग्यश्री डोंगळे, शासननियुक्त संचालक शिवाजी आडनाईक, डॉ.प्रविणचंद्र हेंद्रे, अॅड. प्रशांत पाटोळे, कृष्णात पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
