सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र फाडणे ही विकृती ; काँग्रेसकडून पुस्तक फाडल्याच्या विरोधात जोरदार निदर्शने 

 

कोल्हापूर /प्रतिनिधी: सोनिया गांधी यांचे नुकतेच आत्मचरित्र प्रसिद्ध झाले यांच्या संपूर्ण जगभरामध्ये पाच लाखाहून अधिक प्रतीक विक्री स गेलेल्या आहेत परंतु शिंदे सेनेने या पुस्तकातील पाने जाहीररित्या फाडून त्या पुस्तकाचा अवमान केलेला आहे. हे पुस्तक फाडण्याआधी ते वाचायला हवे होते आणि मगच भावना व्यक्त करायला पाहिजे होत्या असे मत नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी व्यक्त केले आज सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र जाहीर रित्या पाडल्याच्या विरोधात काँग्रेसने निदर्शने केली.

फक्त सूडबुद्धीने या गोष्टी केल्या जात आहेत. ही विकृती आहे. देशासाठी सोनिया गांधी यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. हे भारतातील जनता कधीच विसरणार नाही. असे नगरसेवक राजू लाटकर यांनी स्पष्ट केले.

कोणतीही सुसंस्कृत व्यक्ती अशा प्रकारचे पुस्तक पाडण्याची चूक करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यातील सुसंस्कृतपणा कधीच संपलेला आहे आणि महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसच्या भारती पवार यांनी दिला.

Comments are closed.

error: Content is protected !!