शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि लोकसेवेचा वसा अखंडित जपणार :आमदार राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी झटण्याची शिकवण आणि लोकसेवेचा वसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आमदार व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या विविध विभागांच्या वतीने सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगाचे वाटप, गोमातेसाठी चारा व पशुखाद्य, गरजूंना ब्लँकेट, अंध विद्यार्थ्यांना उबदार कपडे, रुग्णांना जीवनावश्यक वस्तू, अनाथ मुलांना फळवाटप आदी उपक्रमांचा समावेश होता.वाढदिवसाचे औचित्य साधून पांजरपोळ येथील गोमाता संस्थेस राजारामपुरी विभागाच्या वतीने चारा व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदार तपकिरे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दादू शिंदे, शुभम ठोंबरे, अर्जुन संकपाळ आदी उपस्थित होते.

 

शिवसेना मंगळवार पेठ विभागाच्या वतीने भवानी मंडप, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरात रात्रीच्या वेळी फुटपाथवर झोपणाऱ्या गरीब, निराधार आणि गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसांत गरजू नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख रणजीत मंडलिक, गणेश रांगणेकर, राजू पाटील, सचिन पाटील, राहुल चव्हाण, विश्वनाथ माळकर, विजय देसाई, गजानन भुर्के, श्रीकांत मंडलिक, शेखर चौगुले, किरण अतिग्रे आदी उपस्थित होते..जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अंकुश निपाणीकर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले दवाखाना तसेच बालकल्याण संकुलातील अनाथ मुलांना मोफत फळवाटप करण्यात आले. यावेळी कमलाकर जगदाळे, दीपक भाऊ चव्हाण, उदय देसाई, देवेंद्र खराडे, धैर्यशील साळुंखे, रविराज पवार, प्रणव कलकुटकी, सॅमसंग गायकवाड तसेच पांजरपोळ शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दीर्घायुष्यासाठी शिवसैनिकांच्या वतीने अभिषेक करण्यात आला. यावेळी त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू राहो, असे साकडे घालण्यात आले. यावेळी शाहू झुगर, भारत झुगर, उदय सुतार, प्रकाश उपाध्ये, गणेश चौगले, जयवंत शिंगे, संजय आमाने, अक्षय दादर्णे, कैवारी मिटके, सागर मिटके, संदीप ठाकरे आदी उपस्थित होते.शिवसेना उत्तरेश्वर व शुक्रवार पेठ विभागाच्या वतीने विविध आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. केएमटी कर्मचाऱ्यांसाठी कुटुंब स्वास्थ्य कार्ड, नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, कुष्ठधाम येथील रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच पंचगंगा हॉस्पिटलमधील नवजात बालकांना बेबी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, प्रकाश डोंगळे, अनंत पाटील, सूरज धनवडे, राकेश पवार, सुनील काशीद, अमर जाधव, अजिंक्य शिदृक आदी उपस्थित होते.आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वतीने शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगाचे वाटप करण्यात आले. वारकरी संप्रदायाची परंपरा जतन व्हावी, भजन-कीर्तन आणि धार्मिक परंपरांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांसोबतच धार्मिक व सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले.

 

सायंकाळी शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, समन्वयक विनायक साळोखे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण सभापती शीला सोनुले, परिवहन सभापत सत्यजित जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर, माजी नगरसेवक सुहास सोरटे माजी नगरसेवक मारुती माने, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका वंदना मोहिते, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेविका अर्चना पागर, नगरसेविका प्राजक्ता जाधव, नगरसेविका संगीता सावंत, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक वैभव माने, नगरसेवक आस्कीन आजरेकर, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक अभिजित खतकर, शहरप्रमुख रणजीत जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकारण आणि समाजकारण करण्याची शिकवण दिली. त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे नेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे आणि लोकसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे हेच आपले ध्येय आहे. पद, प्रतिष्ठा आणि सत्ता यापेक्षा जनतेने दाखविलेला विश्वास आणि प्रेम हीच आपली खरी ताकद आहे. जनतेच्या आशीर्वादातून विकासकामे आणि समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!