
कोल्हापूर: जगदंब प्रॉडक्शन प्रस्तुत आणि राजदीप प्रॉडक्शन निर्मित शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे २३ ते २८ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.१५० कलाकार,हत्ती घोडे, बैलगाडी संपूर्ण ग्राउंड टच भव्य १०० फुटी रंगमंच यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटते.खऱ्या अर्थाने शंभू महाराज म्हणजेच छत्रपती शंभू महाराज यांच्या चरित्राचा वेध घेणारे आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे महानाट्य कोल्हापुराच्या रांगड्या मातीत होत आहे. अशी माहिती महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र महाडिक यांनी दिली.संभाजी महाराजांची भूमिका डॉ.अमोल कोल्हे तर औरंगजेब यांच्या भूमिकेत ज्येष्ठ सिने अभिनेते रवी पटवर्धन आहेत. महाडिक यांच्या लेखणीतून केलेले संवाद लेखन हे या नाटकातील प्रत्येक प्रसंगाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
आधी शिवाजी महाराज आणि आता या महानाट्याच्या रूपाने संभाजी महाराज या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते. आणि तडफ पराक्रमी असे संभाजी महाराज याचे भान ठेवावे लागते.संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय पुस्तकात फक्त चार पानात लिहिलाय.त्यांचा खरा इतिहास लोकांसमोर आणणे,आणि ते जणू प्रती शिवाजी महाराजच होते.हे आत्ताच्या युवा पिढीला समजले पाहिजे.यासाठीच हा प्रयत्न आहे.से डॉ.अमोल कोल्हे यांनी नमूद केले.
इतिहासाच्या पटलावरील धगधगता निखारा,छत्रपती संभाजी महाराजांच्या अस्सल इतिहासाची साक्ष आणि हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या अभिषिक्त छत्रपतींची पराक्रमगाथा म्हणजेच शिवपुत्र संभाजी हे महानाट्य. शालेय विद्यार्थ्याना सर्व तिकीट दरात ५०% सवलत देण्यात येणार आहे.या महानाट्यामध्ये स्थानिक कलाकारांचाही समवेश असणार आहे.तरी हे महानाट्य पाहण्याची संधी गमावू नये असे आवाहन महानाट्य च्या टीमच्या वतीने करण्यात आले.आहे.पत्रकार परिषदेला नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन, आनंद कुलकर्णी विलास सावंत आणि कलाकार उपस्थित होते.
Leave a Reply