
कोल्हापूर : या वर्षी जागतिक इम्यूनायझेशन आठवड्या ( एप्रिल २४-३०) निमित्त इंडियन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक ( आयएपी ) कोल्हापूरचे विशेषज्ञ भारतातील पाच वर्षांखालील मुलांचे आयुष्य वाचविण्यासाठी राष्ट्रीय लसीकरणास सहाय्य करत असून, २०३० पर्यंत देशात नवजात बालकांचा मृत्यू दर १००० मागे १२ तर पाचवर्षाखालील बालकांचा मृत्यू दर १००० मागे २५ या प्रमाणे कमी करण्याचे लक्ष्य आहे. जेणेकरून भारत आपल्या सशक्त विकास उद्दिष्टांची पूर्तता करू शकेल.
पेडियाट्रिक अकॅडेमीचे अध्यक्ष डॉ.हेमंत भारती यांनी सांगितले की, बालकांचा मृत्यूदर थांबवण्यासाठी लसीकरण हे सर्वात शक्तिशाली साधन आहे. निरंतर आणि तीव्र लसीकरण कार्यक्रमांद्वारे स्मॉल पॉक्स आणि पोलियोसारख्या घातक रोगांपासून जगाला यशस्वीपणे मुक्त केले आहे. आणि आता या रोगांमुळे बालकांचा मृत्यू दर घटवणाऱ्या लसीकरणला महत्व देणे आवश्यक आहे.
निमोनिया आणि डायरिया देशातील घातक आजार असून, पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचे सर्वाधिक मोठे कारण आहे. आयएपी विशेषज्ञानी इंटरनॅशनल वॅक्सीन एक्ससेस सेंटर (आय वीएस) २०१७ मध्ये निमोनिया आणि डायरियाच्या प्रोग्रेस रिपोर्ट आकड्यांचा उल्लेख केला ज्यात भारतात निमोनिया आणि डायरियाविरुद्ध लसीकरण कार्यक्रमाच्या विस्ताराने ९०,००० बालकांचा मृत्यू आणि प्रत्येक वर्षी १ अरब डॉलर बचत करू शकतो.
डिसेंबर २०१८ पर्यंत या रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला ९०% च्या पुढे न्यायचे असून, श्रीराम हॉस्पिटलचे सिनियर पेडियाट्रिक डॉ. रमेश निगडे म्हणाले की, ज्या प्रमुख कारणांमुळे बालकांचा मृत्यू होतो त्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी युआयपी द्वारा तयार केलेल्या लसीकरण सादर करण्याचा प्रयत्न शासन करेल. माझे असे मत आहे की, भारताला ब्रॉड कवरेज नियोमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सीन ( पीसीवी) पाच वर्षाखालील कमी वयाच्या बालकांचे मृत्यू घटवण्याचा संयुक्त राष्ट्राच्या स्थायी विकास उद्देशाला २०३० पर्यंत पूर्ण करण्यास मदत करेल.
भारताचा युनिवर्सल इम्यूनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक स्वास्थ कार्यक्रमांपैकी एक आहे. ज्याचा उद्देश दर वर्षी २.७ करोड नवजात बालकांना निःशुल्क लसीकरण करणे आहे. यात पोलिओ, डिप्थेरिया, परट्यूसिस (सतत खोकला), टिटेनस, ट्यूबरकुलोसिस, मीजल्स, मम्प्स, रूबेला, हिपेटाइटिस बी, रोटावायरस डायरिया आणि निमोनिया सारख्या रोगांचा समावेश आहे. २०१४ साली शासनाने इंद्रधनुष्य लॉन्च केले आहे. त्यानंतर भारतातील निवडक जिल्हे आणि शहरात बालक आणि गर्भवती महिलांनापर्यंत ही इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम पोहोचण्यास २०१७ पासून सुरुवात झाली. २०१४ -२०१५ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण ४ मूल्यांकनानुसार भारतामध्ये ६२ % आणि महाराष्ट्रात ५६.३ % इम्यूनायझेशन प्रमाण आहे. तरीही, निरंतर चालणाऱ्या लसीकरण कार्यक्रमांमुळे या आकड्यांमध्ये सतत सुधार होण्याची आशा आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस पाटील,कोल्हापूर पेडियाट्रिक अकॅडमीचे सचिव डॉ.अरुण पाटील, वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ. राहुल शिंदे निर्मय हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ञ ,डॉ.नरेंद्र नानिवडेकर यांच्यासह तज्ञ, डॉक्टर उपस्थित होते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, प्रतिबंधामुळे एक वर्षात सुमारे 2 ते 3 दशलक्ष मृत्यू थांबवू शकतो. यामुळे कितीतरी जीवघेण्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळाली आहे आणि लाखो जीवन वाचवले आहे . आयएपीच्या तज्ञांनी देशात बालकांचे मृत्यू कमी करण्यासाठी इम्यूनायझेशन भूमिके बद्दल अधिक जागरूकता आणण्यासाठी कटिबद्ध आहे.
Leave a Reply