
दोन मालिका एकत्र आणून त्यांचा महासंगम करण्याची स्टार प्रवाहचीसंकल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘नकळतसारे घडले’ या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा भरभरूनप्रतिसाद मिळाला. आता ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या लोकप्रियमालिकांचा महासंगम येत्या शुक्रवारी, २७ एप्रिलला पहायला मिळणारआहे. ‘गोठ’ आणि ‘छोटी मालकीण’ या दोन मालिकांच्या कथानकातलाट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवेल.छोटी मालकीण या मालिकेत सुरेशच्या शोधात असलेले त्याचे आईवडील गोठ मालिकतेल्या म्हापसेकरांकडे येतात. बयोआजीला भेटतात.राधा त्यांना तिथं पाहते. गोठमधली राधा आणि छोटी मालकीणची रेवतीया दूरच्या मावसबहिणी आहेत. त्यामुळे राधा नीलाच्या चोरओटीच्याकार्यक्रमासाठी रेवतीला आमंत्रण देते आणि त्याचवेळी सुरेशच्या आई-वडिलांना पाहिल्याचं सांगते. रेवतीलाही सुरेशला भेटण्याची इच्छाअसते. नीलाला भेटण्याचा प्रयत्न करणारा निखिल आणि श्रीधरयांच्यात मारामारी होते. श्रीधर आणि रेवती नीलाच्या चोरओटीच्याकार्यक्रमासाठी म्हापसेकरांच्या घरी आल्यानंतर तिथं काय नाट्य घडतं,हे महासंगममध्ये पहायला मिळणार आहे.
गोठ आणि छोटी मालकीण या दोन मालिका एकत्र आणून त्याची एककथा गुंफणं ही अनोखी कल्पना आहे. या मालिकांच्या महासंगममध्येकाय घडणार हे न चुकता पहा शुक्रवारी, 27 एप्रिलला रोजी रात्री9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply