हरहुन्नरी कलाकारांची मांदियाळी असलेल्या’रणांगण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या सोहळ्याला निर्माते करिष्मा जैन,जो राजन, सहनिर्माते अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी,कार्तिक निशानदार बरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग आणि कलाकार सचिन पिळगांवकर, सिध्दार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर ही कलाकार मंडळी उपस्थित होती.नुकताच लाँच झालेल्या या ट्रेलरमधून चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्याबरोबरीने दिसलेले संजय नार्वेकर, मुक्ता बर्वे हे चेहरे… यांची भूमिका नेमकी काय असणार हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहेच मात्र चित्रपटाच्या ट्रेलरवरून एक सुंदर,मनोरंजनात्मक चित्रीकरण रणांगणच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार, एवढं नक्की. या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राकेश सारंग यांनी लिहिली असून चित्रपटाच्या कथेला पूरक संगीत या चित्रपटाला लाभलेल्या अवधूत गुप्ते, राहुल रानडे आणि शशांक पोवार या संगीतकारांनी दिला आहे. तर सचिन पिळगांवकरांनीही एक गाणं संगीतबध्द करून आपली आणखी एक छटा प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. या चित्रपटाला साजेशी गाणी गुरू ठाकूर आणि समीर सामंत यांनी लिहिली असून या चित्रपटाच्या गीतांना आनंदी जोशी, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते यांचे स्वर लाभले आहे.आजच्या युगात आजची कलाकृती मांडणारा 52विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply