
कोल्हापूर : घर, पोल्ट्री फार्म, कारखाने मॉल आदी ठिकाणी जपानी शास्त्रज्ञांनी शोधलेला रंग वापरल्यास घरातील तापमानात घट होते. त्यामुळे फॅन, कुलर, ए.सी. अशा साधानांच्या विज बिलावर होणार खर्च लक्षणीय रित्या कमी होतो. सर्व ऋतूमध्ये घराचे तापमान नियंत्रित राहते तसेच ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनवरे यांना होणारा उन्हाचा त्रास देखील कमी करण्याचे तंत्रज्ञान या रंगांच्यामध्ये आहे अशी माहिती अरहन टेक्नॉलॉजीचे सुरेश रोकडे व महेश रोकडे यांनी दिली. जपान मध्ये या रंगाला दर्जात्मक रंग म्हणून प्रथम स्थान मिळाले आहे काही दिवसातच हा रंग कोल्हापूर मधे तयार होण्याची प्रक्रियाही सुरु होणार आहे जेणेकरून भारतातील उष्णप्रदेश तसेच ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा होईल. उपलब्ध असून पुढील दोन वर्षांत त्याचे उत्पादन कोल्हापूरमधून परदेशात एक्सपोर्ट करण्याच्या मानस असल्याचेही सुरेश रोकडे यांनी सांगितले. जागतिक तापमान वाढ ही जगासमोरील गंभीर समस्या आहे. पृथ्वीवरील तापमान दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता प्रखर आहे. घरातील तापमान कमी करण्यासाठी व गारवा निर्माण व्हावा यासाठी विजेच्या उपकरणांचा वापर करावा लागतो. त्यामुळे विजेचे बिल मोठया प्रमाणात येते. हे सर्व थांबविण्यासाठी जपान मधील शास्त्रज्ञाने उष्णता रोधक रंग तयार केला आहे. हा रंग छताला लावल्यास उन्हाळयात तापमान कमी होते. तर हिवाळयात बाहेरील वातावरणाचा परीणाम न होता वातावरण उष्ण राहते. हा रंग कोल्हापूरच्या बाजारात उपलब्ध करण्यात आला असून पुढील दोन वर्षात त्याचे कोल्हापूर मध्ये उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.याचे हक्क कंपनीला मिळाले आहेत. विविध चाचण्यांद्वारे हे सिद्ध झाले आहे. हा रंग लावल्यामुळे तापमानात ६ ते ११ अंशाने घट झाली आहे. यामुळे रखरखीत उन्हाळ्यातही घरात थंडावा राहणार आहे. अगदी माफक दरात हा रंग उपलब्ध असून यामुळे विजेची, पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला रवी निकम, चंद्रकांत दळवी, इंद्रजित मेडे, उदय भेंडे, आप्पासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते.
Leave a Reply