
उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली कि बच्चेकंपनीची धमाल-मस्तीही सुरू होते. वेगवेगळे प्लॅन्स आखले जातात. या सुटीत मुलांसाठी स्टार प्रवाह एक अनोखी पर्वणी घेऊन आलंय. स्टार प्रवाहच्या विठूमाऊली मालिकेतून पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा उलगडला जातोय. दिवेश मेडगे यात पुंडलिकाच्या भूमिकेत आहे.पुंडलिक आणि विठ्ठल यांच्यातलं नातं गहिरं आहे. अगदी विठ्ठलाच्या आरतीमध्ये ‘पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा’ असा उल्लेखही आढळतो. पुंडलिक त्याच्या लहानपणापासूनच विठ्ठलाचा भक्त होता. पुढे त्या दोघांमध्ये भक्त आणि देव एवढंच नातं राहिलं नाही. तर विठ्ठल पुंडलिकासाठी चक्क कमरेवर हात घेऊन विटेवर वाट बघत उभा राहिला. हा सगळा प्रवास ‘विठूमाऊली’मध्ये पहायला मिळेल. भक्तीभावानं ओथंबलेले असे हे भाग असतील. भक्तासाठी देव विटेवर उभा राहिल्याची ही अनोखी गोष्ट आहे. पुंडलिकाच्या भूमिकेविषयी दिवेश मेडगे फारच उत्सुक आहे. सुट्टी सत्कारणी लागत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिवाय सेट वर बरीच बच्चेकंपनी असल्यामुळे शूटिंग मधल्या फावल्या वेळेत बरीच धमाल येते. त्यामुळे विठूमाऊलीच्या सेट वरचे हे क्षण दिवेशसाठी खूप मोलाचे असल्याचे तो सांगतो.पुंडलिक आणि विठ्ठल यांच्यातल्या नात्याची, पुंडलिकाच्या भक्तीच्या महिम्याची ही गोष्ट चुकवू नये अशीच आहे. त्यासाठी पहात रहा विठूमाऊली ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!
Leave a Reply