
कोल्हापूर : प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेल्या पंचगंगा नदीला पुन्हा पूर्वकालीन स्वरूप आणि महत्व प्राप्त करून देऊन, शिवाय नदीच्या काठावर वसलेल्या पुण्यक्षेेत्रांचे दर्शन, त्यांचा इतिहास, आणि सहवास याचा सुखद अनुभव घेता यावा यासाठी ‘नमामि पंचगंगे’ या नावाने परिक्रमा करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितली.
यावेळी जि.प.अध्यक्षा महाडीक म्हणाल्या की, जीवनदायिनी पंचगंगेच्या प्रवाहाला हजारो वर्षांचे पुण्यपर्व लाभले आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत निसर्गान आपले वरदान भरभरून दिलेले आहे. पंचगंगा ही निरंतर शुध्द व अमृतसंजीवनी व्हावी यासाठी संत,शासन व समाज यांच्या लोकसहभागातून ती स्वच्छ आणि शुध्द राहील यासाठी मोहीम घेणे गरजेचे आहे. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय त्याचबरोबर धार्मीक आणि सामाजिक जाणिवेतून कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांच्या सहभागातून सर्वव्यापक स्वरूपाचा अभ्यास करून एक नियोजनबध्द परिक्रमा राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमल महाडीक म्हणाले की, पंचगंगा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत अशा १६० किलीमीटर अंतरापर्यंत पंचगंगा परिक्रमा राबवण्यात येणार आहे. कोणतीही नदी त्या त्या क्षेत्रातील लोकांकरिता मातृदेवताच असते. त्यामुळे २४ मे रोजी सुर्यास्तानंतर गंगापूजनानिमित्त पंचगंगा घाटावर नदीची पुजा करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रा.मधुकर बाचुळकर, उमाकांत राणिंगा, अॅंड.प्रसन्न मालेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply