शिवाजी विद्यापीठ व एस.पी. जैन इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च मध्ये सामंजस्य करार

 

कोल्हापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी आणि शिक्षकांचीही क्षमता वाढावी यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व एस.पी. जैन इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च यांच्यामध्ये बुधवारी दि. 23 मे रोजी सामंजस्य करार झाला. या करारामुळे कोल्हापूर विद्यापीठाने हाती घेतलेल्या वेगवेगळया उपक्रमांना चालना मिळणार आहे. शिक्षणमंत्राी विनोद तावडे यांच्या उपस्थितीत व कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व एस. पी. जैन इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्चच्या मार्केटिंग विभागाचे डीन आणि प्रोफेसर डॉ. रंजन बॅनर्जी यांनी व्यावसायिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सामंजस्य करारावार स्वाक्ष-या केल्या.सदरच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातुन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठांतर्गत चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. राज्यातील खासगी आणि सार्वजनिक विद्यापीठात झालेला हा पहिला करार आहे.सदरच्या सामंजस्य कराराअंतर्गत एम.बी.ए अधिविभाग , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व मा. प्राध्यापकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी खालील महत्त्व पूर्ण योजना राबविल्या जाणार आहेत. फॅकल्टी डेव्हल्पमेंट प्रोग्रामस्, हेल्प इन केस रायटींग, इम्प्रुव्हींग रिसर्च कॅपॅबिलिटी ऑफ फॅकल्टी, कोलॅबोरेटीव्ह पीएच.डी.प्रोग्राम, इम्प्रु स्टुडंट आउटकम्स्, क्युरिक्युलम रिव्हीजन, कौन्सिलिंग द लिडरशिप, रिसर्च अँड कंसल्टींग ऑन सिलेक्टेड सोशल इनिशिएटीव्हस् ऑफ द गर्व्हनमेंट ऑफ महाराष्ट्र दॅट आर रेलेव्हंट टू दी कोल्हापूर रिजन, एेनी अदर एरियाज ऑफ म्युचअल इंटरेस्ट रिक्वॉयरिंग अपग्रेडेशन.यावेळी सामंजस्य करारासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. एच. एम. ठकार, डॉ. जयदिप बागी , डॉ. कविता ओझा, डॉ. दिपा इंगवले, डॉ. नितीन माळी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!