
मुंबई :आजच्या आधुनिक बिनधास्त प्रवाशांसाठी खास डिजाईन करण्यात आलेले भारतातील पहिली आणि सर्वोत्तम स्मार्ट बॅकपॅक कॅरिऑल ही सध्या चर्चेत असून ह्या बॅकपॅकने तरूणांच्या हृदयाची धडकन असलेले बॉलिवूड कलाकार शाहिद कपूर आणि दिशा पटणी यांचे लक्ष वेधले आहे. शाहिद आणि दिशा ह्या दोघांनाही कॅरिऑल स्मार्ट बॅकपॅक याच्या खास आणि मैत्रीपूर्ण वैशिष्ट्यांमुळे अतिशय आवडले आहेत.
आधुनिक व्यावसायिक प्रवासी हे शक्तीशाली, किफायतशीर आणि उपलब्ध तंत्रज्ञानाच्या काळातील आहेत. हा काळ मल्टिचॅनल हायपर-कनेक्टिव्हिटी, वैयक्तिकरण आणि सानुकूलीकरणाचा (कस्टमायझेशन) आहे. आजचे प्रवासी हे खासगी सोशल माध्यमे आणि वर्क प्लॅटफॉर्म्सवर एकाच वेळेस कार्यरत असतात. आणि म्हणून कॅरिऑलने अभिनवतेसह आधुनिक प्रवाशांना हवे असलेले स्मार्ट बॅकपॅक डिजाईन केले आहेत.ह्या प्रवाशांना अधिक सुविधाजनक, आनंददायी आणि सक्षम प्रवास अनुभव मिळावा हे यांचे ध्येय आहे. कॅरिऑल स्मार्ट बॅग्ससोबत व्यावसायिक प्रवाशांना सक्षम बनवण्याचे ध्येय आहे.
कॅरिऑल स्मार्ट बॅकपॅकने अतिशय स्मार्ट पद्धतीने खण आणि पॉकेट्स डिजाईन केले असून त्यामुळे सहज अॅक्सेस मिळतो आणि यातील बारकाव्यांमुळे यासोबत कुठूनही काम करणे सोपे बनते.ह्या बॅगसोबत एका अॅपसह ब्लूटूथ कनेक्टेड असून त्यामुळे त्यातील सामानासाठी सुरक्षेचा खास स्तर निर्माण होतो. युएसबी चार्जिंग पोर्टसह ह्या बॅगमध्ये चार्जिंगही उपलब्ध आहे.ह्या स्मार्ट बॅकपॅकचे डिजाईन ही निलेश अहिरे यांची अभिनवता आहे. कॅरिऑलचे सीईओ निलेश हे बाजारपेठेमध्ये नेहमीच काहीतरी नवीन आणण्यासाठी मानले जातात. ह्या उत्पादनाच्या यशाबद्दल ते म्हणाले, “कॅरिऑल स्मार्ट बॅकपॅक हे आजच्या आधुनिक व्यावसायिक प्रवाशांसाठी आदर्श आहेत. शाहिद कपूर आणि दिशा पटणी यांनी ह्या बॅगची खास वैशिष्ट्ये आणि प्रवास करतानाचे फायदे पाहिले. प्रत्येक प्रवाशाने आपल्या बॅगसोबत खासगी आणि भावनिक पातळीवर जोडलेले असावेत हे आमचे ध्येय आहे.”
कॅरिऑल स्मार्ट बॅकपॅकबद्दल दिशा पटणी म्हणाली, “कॅरिऑल स्मार्ट बॅकपॅक माझ्या आयुष्यात आहे याचा मला आनंद आहे. मला लागणारे सगळे सामान यात मावते, त्यामुळे ह्या बॅकपॅकच्या आकारावर जाऊ नका आणि तुम्हांला जर असे वाटत असेल की बॅकपॅक हे केवळ मुलांसाठी असतात, तर सॉरी… असे अजिबात नाही…मुलींनाही बॅकपॅक खूप आवडतात.”
भारतातील नवीनतम स्मार्ट बॅकपॅक कॅरिऑलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लॉग ऑन करा- www.carriall.com
Leave a Reply