स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा

 

मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर 10 जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की अनुभवावा असाच आहे.अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते.

सई देवधर, गश्मीर महाजनी आणि मानसी नाईकच्या दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली.स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांतील कलाकारांनीही लक्षवेधी नृत्याविष्कार केला. ज्ञानदा रामतीर्थकर, गौरव घाटणेकर, अजिंक्य राऊत, सायली देवधर, विकास पाटील, हरीश दुधाडे, अक्षर कोठारी, ऐतशा संझगिरी, रुपल नंद, समीर परांजपे यांच्या परफॉर्मन्सचा धमाका झाला. तर अभिनेता स्वप्नील जोशीनंही दणक्यात ‘रणांगण’ गाजवलं.दमदार परफॉर्मन्सेस आणि मराठी मनोरंजनाचा तडका असलेला हा रंगारंग सोहळा पाहायला विसरु नका रविवारी, १० जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!