
कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय.व्ही. रेड्डी यांचे येत्या शनिवारी (दि. ९ जून) सायंकाळी ५.३० वाजता येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा विषय ‘बँकांची सुरक्षितता’ असा आहे.
या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे असतील, तर रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. श्रीमती उषा थोरात आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. वित्तीय, बँकिंग क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसह नागरिकांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि अध्यासनाचे समन्वयक डॉ. व्ही.बी. ककडे यांनी केले आहे.
Leave a Reply