
कोल्हापूर: कळंबा तलावाची आज महापौर सौ.अिानी रामाणे यांनी नगरसेवक, अधिकारी व कळंबा ग्रामपंचायती सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली.
शासनाकडून प्राप्त झालेल्या 10 कोटी अनुदानामधून कळंबा तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाबाबत कळंबा ग्रामस्थांनी काही कामाबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे सदरचे काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आज महापौरांनी कळंबा ग्रामपंचायती सरपंच, सदस्य व ग्रामस्थं यांचेसमवेत या कामाची पाहणी करुन त्यांच्या सुचना जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी प्रामुख्याने पाण्याच्या पुर्ण संचय पातळीच्या आत कोणतीही कामे करु नये, तलावातील नैसर्गिक पाण्याचे मार्ग सुरक्षित ठेवणेत यावेत, तलावातील गाळ काढणे, तलावाभोवती कंपौंड उभारणे व बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे अशी प्रामुख्याने कामे करावीत अशा सुचना केल्या.
यावेळी महापौर सौ.अिानी रामाणे यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सुचनांची दखल घेवून महापालिकेने सुधारीत आराखडा तयार केला आहे व आराखडयाची माहिती जल अभियंता मनिष पवार यांनी ग्रामस्थंाना दिली. यामध्ये या आराखडयात कळंबा तलावातील संचय पातळीच्या बाहेर 10 मीटर बफर झोन ठेवणेत आला आहे. या झोनच्या बाहेर सर्व कामे करण्यात येणार आहे. यामध्ये गणेश विसर्जन कुंड, सायकल ट्रॅक, योगा केंद्र, लॉन, जनावरांसाठी स्वतंत्र कुंड यांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले.
यावेळी उपायुक्त विजय खोराटे, गटनेता शारंगधर देशमुख, नियाज खान, नगरसेविका सौ.प्रतिक्षा पाटील, जल अभियंता मनिष पवार, उपजल अभियंता सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, कळंबा ग्रामपंचायतीचे सरपंच अजय सावेकर, उदय जाधव, दिपक तिवले, पर्यावरणवादी उदय गायकवाड, अनिल चौगुले, कन्सलटंट अभय जोशी, ठेकेदार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित हो
Leave a Reply