
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय गूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेस आज येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एम.सी.ई.डी.) कोल्हापूर व भंडारा शाखांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या सेमिनार सभागृहात ही कार्यशाळा सुरू झाली.
यावेळी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी गूळ क्लस्टरविषयक मार्गदर्शन केले. एम.सी.ई.डी. (भंडारा)चे प्रकल्प अधिकारी ए.एम. कडककर, एम.सी.ई.डी. (कोल्हापूर)च्या प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कोल्हापूर जॅगरी क्लस्टरचे अध्यक्ष राजाराम पाटील, बाळासाहेब पाटील, व्ही.टी. जाधव, पी.एन. देवळी यांच्यासह भंडारा येथील २५ गूळ उत्पादक व क्लस्टर सदस्य उपस्थित होते. आज दिवसभरात झालेल्या चर्चासत्रांत उसाच्या विविध जाती, गूळ उत्पादनाचे आधुनिकीकरण, गुळाचे मार्केट व दर या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. १३ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेअंतर्गत परिसरातील विविध गुऱ्हाळघरांना भेटींचेही आयोजन करण्यात आले आहे
Leave a Reply