
कोल्हापूर : वस्त्रोद्योगामधील संशोधन व रोजगार संधी यांमध्ये वृद्धीसाठी डीकेटीईच्या टेक्स्टाईल्स व अभियांत्रिकी इन्स्टिट्यूटने इनक्युबेशन सेंटर स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळ (ए.आय.सी.टी.ई.) व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सी.आय.आय.) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या देशव्यापी सर्वेक्षणांतर्गत देशातल्या सुमारे २१६१ तंत्रशिक्षण संस्थांमधून इचलकरंजी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ॲन्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटला ‘सर्वोत्कृष्ट इंडस्ट्री लिंक्ड केमिकल ॲन्ड अलाइड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट (पदवी)- २०१५’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संस्थेचे संचालक व माजी मंत्री प्रकाश आवाडे व प्राचार्य डॉ. पी.व्ही. कडोले यांनी आज दुपारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कुलगुरूंनी त्यांना विशेष अभिनंदन पत्र प्रदान करून कौतुक केले.
डीकेटीई संस्थेने मिळविलेले राष्ट्रीय स्तरावरील यश अत्यंत कौतुकास्पद असून शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद असल्याचे कुलगुरूंनी यावेळी सांगितले. संस्थेच्या वाटचालीमध्ये अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व प्रकाश आवाडे यांचे सहकार्य व मार्गदर्शनाचाही या यशात मोलाचा वाटा असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी केला. संस्थेच्या भावी प्रगतीसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
यावेळी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. सी.डी. लोखंडे उपस्थि
Leave a Reply