
मोठ्या भावाच्या नात्याने उंबरे कुटुंबियांच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगड उतरताना दगड डोक्यात कोसळून मृत्यू झालेल्या उळूप (ता. भूम, जि. उस्मानाबाद) येथील शिवभक्त अशोक उंबरे यांच्या कुटुंबीयांना आज त्यांनी भेट दिली व कुटुंबियांचे सांत्वन केले.किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना, अंगावर दगड पडुन दुर्दैवी अंत झालेल्या अशोक उंबरे यांच्या घरी आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दीली. अशोक उंबरे यानां आई नाहीत. त्यांचे वडील मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करतात.
त्यांच्या कुटुंबियांच्यावर या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अशोक उंबरे यांच्या मित्राने सांगितले की अशोक दु.२.३० वा. गडावरून खाली उतरला , माकडांच्यामुळे दगड खाली आलेने तो त्यांच्या अंगावर कोसळला व त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबाचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले असून अशोक उंबरेचा मृत्यु मनाला चटका लावणारा आहे.या दुखःद घटनेमूळे त्यांच्या कुटुंबियांच्यावर आघात झाला आहे. एक शिवभक्त म्हणून त्यांना मदत करणे माझे कर्तव्य आहे.यापुढेही त्यांच्या कुटु़बियांची जबाबदारी मोठा भाऊ म्हणून मी स्विकारत आहे, असे भावनिक उद्गार संभाजीराजे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.अशोक चे मित्र भरतारी वारके यांना उंबरे कुटुंबाची सर्व जबाबदारी देण्यात आली असून या पुढे कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास त्वरीत संपर्क करण्यास सांगितले आहे.तसेच मुख्यमंत्री साह्यता निधीतून २ लाख रुपये व वयक्तिक मदत म्हणून १ लाख रुपये त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.
Leave a Reply