

मायानाधी चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी भेटलेल्या या टीमने साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या उपस्थितीत या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा केली आहे. यावेळी मायानाधी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारे टोविनो थॉमस उपस्थित होते तर या चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी उत्सुक असलेले जो राजन आणि सचिन पिळगांवकरांनीही या सक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. मल्यालम मायानाधी चे निर्माते संतोष कुर्विल्ला आणि आशिक अबु हिंदी रिमेकची ही निर्मिती करणार आहेत तर त्यांच्या जोडीला हिंदी रिमेकसाठी निर्माते म्हणून सचिन पिळगांवकर पुढे सरसावले आहेत. आशिक अबु दिग्दर्शित या मल्यालम कलाकृतीच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन लव्ह यू सोनियो चे दिग्दर्शक जो राजन करणार आहेत.
या चित्रपटाच्या पटकथेची उत्कंठावर्धक बांधणी, टोविनो थॉमस आणि ऐश्वर्या लेक्ष्मी यांच्यातील फ्रेशनेस या सगळ्यांचीच हिंदीत होणारी मांडणी पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Leave a Reply