
कोल्हापूर : (पंडित) करवीर तालुक्यातील बऱ्याच कामगारांना श्रावण बाळ, संजय गांधी, इंदिरा गांधी व अपंग अशा योजनातून सरकारी पेन्शन मिळत आहे. सरकारी पेन्शन मधून बऱ्याच लोकांना तसेच वृद्धांना देखील आधार मिळतो. याच्या लाभामुळे औषध उपचार करता येतात परंतु गेले चार-पाच महिने पेन्शन मिळाली नसल्याने सर्व कामगार आर्थिक अडचणीत आहेत. वृद्धांना दुसरा कोणता आधार नसल्याने आर्थिक संकटात आले आहेत तरी पेन्शन लवकरात लवकर मिळणेबाबत कार्यवाही व्हावी यासाठी समस्त कामगारांच्यावतीने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यावतीने करवीर तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले लाभार्थ्यांना पेन्शन खात्यावर जमा व्हावी तसेच सहाशे रुपये मिळणाऱ्या पेन्शनमध्ये मध्ये मध्ये वाढ होऊन दोन हजार रुपये इतकी वाढवावी अश्या मागण्या निवेदनात निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत
Leave a Reply