कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी विविध आघाड्यांच्यावतीने कार्यरत असून भाजपा टॅक्सी टूरींग युनियनच्या माध्यमातून या क्षेत्रातील निगडीत व्यावसायिक लोकांसाठी अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रत्यन सुरु असतो. कोल्हापूर मध्ये भाजपा टॅक्सी टूरींग युनियनचे काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. त्याचबरोबर कोल्हापूर हे पर्यटन केंद्र असल्यामुळे या युनियच्या काही मागण्या आणि समस्या निर्माण झाल्या होत्या. या संदर्भात प.मं.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई, ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष श्री सयाजी आळवेकर, श्री संजय सावंत, श्री हेमंत आराध्ये, श्री अमोल पालोजी तसेच भाजपा टॅक्सी टूरींग युनियन अध्यक्ष श्री सचिन जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली या विविध मागण्यांचे निवेदन दि.१३/०७/२०१७ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी डी.टी.पवार यांना सादर करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ११ प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये भाजपा टॅक्सी टूरींग युनियनच्या मागणी प्रमाणे पुढील दोन मागण्या दिनांक २०/०१/२०१८ रोजी पासून प्रादेशिक परिवहन अधिकारी डी.टी.पवार यांनी मान्य केल्या आहेत.
Leave a Reply