महाराष्ट्रातील ‘गोटया’ रंगणार ६ जुलैला पडद्यावर

 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील पारंपारिक खेळ गोट्या जो प्रत्येकाने लहानपणी खेळला आहे पण इतर खेळाच्या मानाने त्याला फारसे महत्व आज पर्यंत मिळाले नाही. अनेक खेळांची रंजकता पहिली आहे. मात्र खास मुलांच्या भावविश्वासाची जोडला गेलेला मातीतला खेळ याला तेवढे महत्व दिले गेले नाही. आज डिजिटल युगात काळाबरोबर खेळही बदलत गेले असल्याने हत्तू, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, विटी दांडू, लगोरी असे पारंपारिक खेळ दुर्मिळ होण्याचा मार्गावर आहेत. यामुळेच गल्ली बोळात खेळला जाणारा ‘गोट्या’ हा खेळ एक विशिष्ट मर्यादेत राहिला. अशा खेळातील गंमत आणि तो खेळ म्हणून इतर नॅशनल खेळात समाविष केल्यास कसे करावे लागेल अशा काही गोष्टी खूप सुंदर पद्धतीने दाखवणारा चित्रपट ‘गोट्या’ येत्या ६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

अभ्यासाबरोबर खेळही उपयुक्त आहेतच त्याचबरोबर गोट्या खेळ हा सर्वांच्या आवडीचा आणि प्रत्येक ठिकाणी खेळला जाणारा असला तरी त्याला आजपर्यंत त्याला एका विशिष्ठ कुत्शीत नजरेने व वेळ घालवण्यासाठी फक्त टाईमपास खेळ म्हणून गणले जाते मात्र हा खेळ आणि त्या खेळ खेळताना प्रत्यक्ष जे जे घडते त्यावर आधारित अशी कथा असणारा चित्रपट निर्मिती जय केतनभाई सोमैया यांनी केली असून दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे यांनी केले आहे. विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या चित्रपटात ऋषिकेश वानखेडे, राजेश शृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा हेमांगी, शरद सांखला आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. कथा / पटकथा / संवाद / गीतलेखन / दिग्दशिन सर्व भगवान पाचोरे यांनी केले आहे. अवधूत गुप्ते यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली असून त्यांच्यासह बेला शेंडे, आदर्श शिंदे, जसराज जोशी, कौस्तुभ गायकवाड, आगलावे यांनी गाणी गायली आहेत. गोट्या हा खेळ कसा उत्तम रित्या खेळून तोही खेळ इतर मान्यताप्राप्त खेळामध्ये कसा समाविष्ठ करता येवू शकते हे उत्तम रित्या हा चित्रपटातून सांगण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!