
कोल्हापूर: ‘तू का पाटील’ हा गावची गोष्ट सांगणारा चित्रपट येत्या शुक्रवारी २२जून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राला लावणी ची मोठी परंपरा आहे. आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीत अनेक to प्रधान चित्रपट येऊन गेले. पण संपूर्ण महाराष्ट्रातील विविध लोकनृत्य आणि लावणीच्या छटा असणारा हा पहिलाच चित्रपट आहे. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारे कथानक असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मच्छिंद्र चाटे यांनी केले आहे. बिनधास्त, चिमणी पाखरं सारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मिती नंतर तू. का. पाटीलच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शनात पहिले पाऊल मच्छिंद्र चाटे यांनी टाकले आहे. मराठी माणसाला आपला वाटावा आणि संपूर्ण कुटुंबासह बघता येईल अश्या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन मच्छिंद्र चाटे यांनी केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास चाटे समूहाचे संचालक प्रा.भारत खराटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.मच्छिन्द्र चाटे यांनी तब्बल ९ वर्षानंतर चित्रपट क्षेत्रात पुनःपदार्पण केले आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी देवयानी मूव्हीज प्रस्तुत ‘तु .का.पाटील’या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. गावची गोष्ट म्हणजे पाटील हे जणू समीकरण च आहे पण या चित्रपटात पाटील हे खलनायक आहेत की नायक ही प्रेक्षकांची उत्कंठा नक्कीच वाढवेल.असे पाटलाची भूमिका साकारणारे नागेश भोसले यांनी सांगितले विशेष म्हणजे सेन्सॉर बोर्डने यात एकही कट सुचविलेला नाही यातच या चित्रपटाचे यश आहे.चित्रपटातील तमाशा फडाची मालकीण असणाऱ्या अंबिका देवी ही भूमिका मैथिली जावकर यांनी साकारली आहे. या आधीही स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’मध्ये आणि ई टिव्ही वरील मायलेक अश्या दोन्ही मालिकांमध्ये लावणी नृत्यांगना म्हणून त्यांनी भूमिका केल्या होत्या. प्रेक्षकांनी या भूमिकेला पसंती दिली होती. यातील लावण्याचे ३ प्रकार यांच्यावर चित्रित करण्यात आल्या आहेत. अंबिका देवी आणि पाटील यांच्यातील संघर्ष कथा यात पहायला मिळणार आहे.यांच्यातील ठसन म्हणजे शत्रुत्व हाच चित्रपटाचा गाभा आहे. मैथिली जावकर आणि नागेश भोसले यांच्या अभिनयाची जुगलबंदी यात दिसेल असे अभिनेत्री मैथिली जावकर यांनी सांगितले.
तु.का. पाटील’ चे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट महाराष्ट्राची लावणी परंपरा जपणारा आहे.अनेक प्रकारच्या लावणीचे प्रकार आणि नृत्यातील विविधता साकारायला मिळाली,हा माझा दुसरा चित्रपट आहे पण खूप शिकायला मिळाले असे सुकन्या काळन हिने सांगितले.
सुश्राव्य गाणी आणि भव्य नेपथ्य हा या चित्रपटाचा गाभा आहे.या चित्रपटाची कथा ‘सांगत्ये ऐका’ या चित्रपटावर आधारित आहे. यामध्ये एकूण १६ गाणी आहेत आणि त्यातून लावणी या संगीताचे अनेक प्रकार दिसतात.फडावरची लावणी, सवाल जवाब , बैठकीची लावणी,वग नाट्य अशी वैविध्यता यात आहे.अनेक वर्षानंतर मराठी चित्रपटात मध्ये मोठे दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत नागेश भोसले,मैथिली जावकर,संजय खापरे,भार्गवी चिरमुले,सुकन्या काळन,प्रिया बेर्डे,भारती नाटेकर,संदीप पाठक,सिद्धेश्वर झाडबुके हरीश दुधाडे,अभय राणे,सुरेखा पुणेकर, सतीश वाळिंबे,रमाकांत मालपेकर,उमेश बोलके यांच्यासह १५ पाहुणे कलाकार यात अशोक शिंदे, स्मिता शेवाळे,मीरा जोशी,छगन चौगुले,प्रताप आजगेकर,संगीता भावसार,राजेश सरकटे, सिया पाटील,अनुराधा राजाध्यक्ष,सुरभी हांडे,पूर्वा सुभाष,माधवी नाटेकर,अश्विनी जोशी,माधव नाटेकर,आणि मोहन जोशी व बालकलाकार विवान नाटेकर आणि साईषा नाटेकर आहेत.पत्रकार परिषदेत , सहनिर्माते अविनाश चाटे ,सहनिर्माती सौ. भारती नाटेकर,अभिनेते नागेश भोसले ,अभिनेत्री मैथिली जावकर,अभिनेत्री सुकन्या काळन,गायक आशिष नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply