सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरीच्या जुलैपासून अभ्यासक्रमांना प्रारंभ

 

कोल्हापूर : येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सुरू करण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागामध्ये येत्या जुलैपासून अभ्यासक्रम सुरू होतील, अशी माहिती सेक्टर स्कील कौन्सिलचे विशेष अधिकारी प्रवीण मोरे यांनी दिली.शासकीय तंत्रनिकेतन व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचा संयुक्त उपक्रम असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागामध्ये जेम्स अँड ज्वेल्स सेक्टर स्कील कौन्सिल, मुंबईच्या वतीने तयार करण्यात आलेला हँडमेड गोल्डस्मिथ अभ्यासक्रमचा कोल्हापुरातील उद्योजकांसमोर अभिप्राय घेण्याकरिता पाठ्यक्रमाबाबत एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे संचालक विजयकुमार भोसले, अशोक झाड,संजय पाटील, महेश जोके,रवींद्र खेडेकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी मोरे म्हणाले,सेक्टर स्कील कौन्सिलकडून सेंटर ऑफ एक्सलन्स इन जेम्स अँड ज्वेलरी विभागामध्ये समकक्षता देण्याबाबत प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन जुलैपासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे संचालक विजयकुमार यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या अभ्याक्रमामुळे येथील व्यवसाय विकसित होऊन जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करेल. कुणाल बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. सीईजेजेचे समन्वयक शशांक मांडरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे संचालक शिवाजी पाटील, संजय चोडणकर,कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे संचालक अशोक झाड, संजय पाटील, सुनील मंत्री, महेश जोके, तुकाराम माने, राजू चोपडे, गजानन बिल्ले, संजय खद्रे  यांच्यासह रवींद्र खेडेकर, गजानन भुर्के,गजानन पेडणेकर, विशाल बेलवलकर, सुरेंद्र रायकर,सुशांत जामसांडेकर,जयवंत बेलवलकर,ऋषीराज पेडणेकर, कपिल पेडणेकर, उल्हास नागवेकर, मिलिंद जामसांडेकर, अभिजित पोतदार, अवधूत शिरोडकर,शिवानंद पेडणेकर, निखिल नार्वेकर, राजेश जामसांडेकर, दत्तात्रय जामसांडेकर, अभिजित देवरूखकर, सुनील पेडणेकर, उदय देवरुखकर,गजानन भुर्के, ओंकार भुर्के,मदन कवडे, प्रिया जाधव व राजेश्वरी जाधव आदी उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!