विद्यापीठातील योग शिबिरात ११०० साधकांचा सहभाग

 

कोल्हापूर:शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी)  यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. येथील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. संलग्नित महाविद्यालयांतून झालेल्या योग शिबिरांत सुमारे ३० हजार साधकांनी सहभाग नोंदविला.

संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आजशिवाजी विद्यापीठात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासूनम्हणजे २१ जून, २०१५ पासून ‘योगशक्ती -योगयज्ञ’अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात सलग तीन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात. त्याची यंदा यशस्वीरित्या त्रिवर्षपूर्ती झाली.

या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांत योगसाधनेविषयी जागृती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना दैनंदिन स्वरुपात योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते.यावेळी कणेरी मठाच्या योग प्रशिक्षकांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिवडॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडाविभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड,सौ. अनिता शिंदे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रेखा सारडायांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवकउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!