फ्लिपकार्ट व वॉलमार्ट यांच्या भागीदारीमुळे स्थानिक पुरवठादार व उत्पादक थेट ग्राहकांपर्यंत 

 

वॉलमार्ट ही गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आमच्या बी२बी व्यवसायाद्वारे (होलसेल कॅश-अँड-कॅरी) आम्ही भारतातील लाखो छोट्या किराणा दुकानांना फक्त यशाचा मार्ग दाखविण्यासाठी सहकार्य करत नसून त्यांना आधुनिक होण्यासाठीही मदत करत आहोत.भारतातील स्थानिक उत्पादकांना कायम पाठिंबा देण्याचा आमचा सदैव प्रयत्न असतो. लघू, सूक्ष्म आणि मध्यम पुरवठादारांकडून तसेच छोटे शेतकरी आणि महिलांच्या मालकीच्या व्यवसायांकडून पुरवठा केला जात आहे. आमच्याकडे येणारी ९५ टक्के उत्पादने ही देशातूनच येत असून हेच आमच्या व्यवसायाचे खरे रहस्य आहे.भारत हा एक महत्त्वपूर्ण देश असून वॉलमार्ट या देशातूनच मोठ्या प्रमाणात उत्पादने अन्य वॉलमार्ट बाजारपेठांसाठी पुरवत आहे. हस्तकला, वस्त्रोद्योग, कपडे आणि फार्मास्युटिकल्स इत्यादी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्पादने पुरवली जात असून त्यामुळे स्थानिक उत्पादकांना तसेच निर्यातीला मोठा हातभार लागत आहे.भारत सरकारच्या एफडीआय धोरणानुसार, १०० टक्के परदेशी गुंतवणूक केली जात आहे. फ्लिपकार्टसोहत असलेल्या आमच्या भागीदारीमुळे हजारो स्थानिक पुरवठादार आणि उत्पादकांना या मार्केटप्लेस मॉडेलनुसार थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे. या भागीदारीमुळे देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम पुरवठादार तसेच शेतकऱ्यांना या व्यासपीठाद्वारे थेट बाजारपेठ उपलब्ध झाली असून यामुळे भारतातील स्थानिक उत्पादकतेला मोठी चालना मिळणार आहे.फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट यांच्या संयुक्त क्षमतेमुळे भारतात आघाडीचे ई-कॉमर्स व्यासपीठ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास आहे. यामुळे दर्जेदार आणि किफायतशीर उत्पादने देशातील ग्राहकांना प्रदान करण्यास तसेच नवीन कुशल नोकऱ्या निर्माण करण्यास त्याचबरोबर छोट्या पुरवठादारांना, शेतकऱ्यांना आणि महिला उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होण्यात मदत होईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!