
कोल्हापूर :- चला हवा येऊ दया हा झी मराठी वरील कार्यक्रम घराघरात अगदी अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.प्रत्येक भागात नवीन आणि हास्याचा धमाका उडवून देणाऱ्या या कार्यक्रमाची टिम आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाली आहे.गेल्या दिड वर्षापासून लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या कार्यक्रमाची टीम महाराष्ट्रातील विविध शहरांना भेटी देणार आहे.याची सुरुवात 9 डिसेंबर ला नवी मुंबई म्हणजेच पनवेल येथून झाली. नेहमी टीवी वर दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्षात बघण्याचा संधीचा फायदा पनवेलकरांनी उचलला. प्रचंड प्रतिसदानंतर दुसऱ्या टप्यात सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे 16 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे सूत्रधार डॉ. निलेश साबळे यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारताना दिली.कोल्हापुरतील सीपीआर येथे 6 महीने मी प्रॅक्टीस केली आहे.कोल्हापुरशी माझे जुने नाते आहे असेही ते म्हणाले.भारत गणेशपूरे,सागर कारंडे, कुशल बद्रीके आणि विनीत बोंडे यांनीही आपले अनुभव सांगितले. कोल्हापुरतील रंकाळा,महालक्ष्मी मंदीर तसेच शहरातील मुख्य ठिकाणी या कार्यक्रमाचे शुटिंग झाले असून कोल्हापूर आणि सांगली येथे चित्रित झालेले भाग येत्या 21 आणि 22 डिसेंबर रोजी झी मराठी वरुन प्रसारित होणार आहेत.
एरवी स्टुडिओ मधे काही मोजक्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील विविध शहरे तसेच गावातील प्रेक्षकां पर्यंत प्रत्यक्ष पोहचणार आहे.सांगली येथील कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य असून प्रवेशिका भावे नाट्यगृह येथे उपलब्ध आहेत.पत्रकार परिषदेस चला हवा येऊ दया ची टीम संपूर्ण उपस्थित होती.
Leave a Reply