
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठवाड्यात सुरू झालेले मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे लोण कोल्हापूरसह जिल्ह्यात पसरले आहे. आज (मंगळवार) सकाळी दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चासह विविध मराठा संघटनांतर्फे ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून कोल्हापूर शहरात बंदचे आवाहन केले. या आंदोलनास पाठिंबा देत महाद्वार रोड, गुजरी परिसर, शिवाजी रोड, बिंदू चौक. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मुख्य बस स्थानक परिसरात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.
खबरदारीचा उपाय म्हणून केएमटी प्रशासनाने सकाळी साडेअकराच्या सुमारास विविध मार्गावरील बसेस बंद केल्या आहेत. मात्र अद्याप एसटी सेवा सुरु आहेत. दसरा चौकात सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व्यासपीठावर आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, महापौर शोभा बोंद्रे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, नगरसेवक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र भाजपचा एकही पदाधिकारी येथे उपस्थित नव्हता.
Leave a Reply