
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले आहे. मराठा समाजाचा हा एल्गार संपूर्ण कोल्हापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात वादळासारखा पसरत आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणी साठी महाराष्ट्रात ५८ मराठा क्रांती मोर्चे शांततेत पार पडले, या मोर्चाना दोन वर्षांचा कालावधी उलटूनही आजपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळालेले नाही. आरक्षण नसल्याने गेली अनेक वर्षे शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाची पीछेहाट होत असून, आता आश्वासन नको, आरक्षण द्या, अशी जोरदार मागणी भगिनी मंचच्या वतीने करीत दसरा चौक येथे गेले बारा दिवस सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठींबा दिला.
आज सकाळी भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या नेतुत्वाखाली भगिनी मंचच्या महिला सदस्यांनी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ ते दसरा चौक असा मोर्चा काढून दसरा चौकातील आंदोलन स्थळी ठाण मांडली. यावेळी आपल्या जाहीर पाठींब्याचे पत्रक त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर अर्पण केले. यावेळी भगिनी मंचच्या महिला सदस्यांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणानी दसरा चौक परिसर दणाणून सोडला.
यानंतर याच ठिकाणी चपाती – भाजी खाऊन मराठा आरक्षण प्रश्नी शासनाच्या वेळ काढू धोरणाचा त्यांनी निषेध करीत अभिनव आंदोलन केले.
यावेळी बोलताना भगिनी मंच अध्यक्षा तथा देवस्थान समिती कोषाध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांनी, मराठा आरक्षणासाठी जाहीर पाठींबा देत, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या समाज बांधवांना श्रद्धांजली वाहिली. यासह मराठा आरक्षणाचा हक्क आपण लढवून मिळवूया यासाठी पुढील काळात मराठा समाज बंधू –भगिनींनी आत्मबलीदानासारखे पाउल उचलू नये, अशी कळकळीची विनंती केली. त्यापुढे म्हणाल्या, आमदार राजेश क्षीरसागर हे मराठा आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्षे विधानसभेत मांडत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक मराठा आमदार म्हणून ते या लढ्यात अग्रभागी राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी शिवसेना नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, सौ. दिशा ऋतुराज क्षीरसागर, सौ. मंगलताई साळोखे, सौ. अनुराधा मोहिते, सौ.सुनिता सासणे, सौ. वंदना मोहिते, सौ. सुनिता क्षीरसागर, सौ.पद्मा बावडेकर, सौ. अंजली पाटील, सौ. सरिता तोडकर, सौ. पूजा भोर, सौ. मंगल कुलकर्णी, सौ.गौरी माळदकर, सौ.गीता भंडारी, सौ. पूजा कामते, सौ. पूजा पाटील, कु. रुपाली कवाळे, सौ. सोनाली पेडणेकर उपस्थित होते.
Leave a Reply