
कोल्हापूर:सीपीआर रुग्णालय हे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे केंद्र आहे. जेथे जिल्हाभरातून वेगळ्या प्रकारचे रुग्ण, अपघातग्रस्त रुग्ण, सेवा घेण्यासाठी येतात. त्यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे त्यामध्ये रुग्णालयात काम करणाऱया कर्मचाऱयांना म्हणजेच नर्सेस, क्लार्क व इतर कर्मचारी यांना कायद्याने सहभागी होता येत नाही. तरी देखील सीपीआर मधील अनेक कर्मचारी संपात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. यागोष्टीची दखल घेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वतीने सदर प्रकरणी आज सी.पी.आर. चे अधिष्ठाता यांना निवदेन देण्यात आले. वैद्यकीय क्षेत्र आणि शासकीय रुग्णालये आत्यावश्क सेवेमध्ये अंतर्भूत आहेत. जिल्हाभरातून रुग्णांचा ओघ सीपीआर रुग्णालयामध्ये होत असतो. त्यांची होणारी असुविधा म्हणजेच रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार आहे.
त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करून,आपल्या कर्तव्याशी कसुराई करणाऱ्या अशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने संपामध्ये जे सीपीआरचे कर्मचारी सहभागी झाले आहेत त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेमध्ये रुजू होण्याचे आपल्याकडून आदेश देण्यात यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.निवेदन स्विकारून युवा मोर्चाच्या प्रतिनिधिंना आश्वस्त करत सी.पी.आर.चे अधिष्ठाता श्री नणंदकर म्हणाले, सदर प्रकरणी महाराष्ट्र शासनाकडून याप्रकरणी आदेश प्राप्त झाले असून अनधिकृतपणे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
Leave a Reply