फोर्टीस हेल्थकेअर,मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम ह्युमनीटरीयन अॅण्ड चॅरिटी एस्ट.व दुबई हेल्थ अथॉरिटी यांच्याकडून १३२ मोफत कार्डिअॅक शस्त्रक्रिया पूर्ण

 

दुरुस्तीस्वरूप कार्डिअॅक शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रिया एका आठवड्यात एस एल रहेजा हॉस्पिटल (फोर्टीस असोसिएट) माहीम आणि फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड येथे पार पडल्या. भारतात२ लाखांहून अधिक अर्भकांनाकन्जेनिटल हार्ट डिसीज (सीएचडी) असतो. म्हणजेच, ही बालके हृदयरोग घेऊनच जन्माला येतात. यातील बऱ्याच मुलांना परिणामकारक उपचार मिळत नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांवरचे हे ओझे कमी करण्यासाठी मोहम्मद बिन रशीद अल मख्तुम ह्युमनीटरीयन अॅण्ड चॅरिटी एस्ट. आणि दुबई हेल्थ अथॉरिटी यांनी फोर्टीस हॉस्पिटल, मुंबई यांच्या सहकार्याने १३२ शस्त्रक्रियांची जबाबदारी उचलली. ‘झायेदचे वर्ष’ म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीचे संस्थापक शेख झायेद यांच्या १००व्या वाढदिवसाचे प्रयोजन साधून हा उपक्रम राबविला गेला. फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड येथील विभागीय संचालक डॉ. एस.नारायणी आणि एसएल रहेजा हॉस्पिटल,माहीम येथील विभागीय संचालक डॉ.बिपीन चेवले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेतला गेला.एका आठवड्याचा हा उपक्रम ७ जुलै रोजी सुरू झाला आणि १३ जुलै रोजी संपन्न झाला.यात १३२ दुरुस्तीस्वरूप शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रिया फोर्टीस हॉस्पिटल मुलुंड आणि एसएल रहेजा हॉस्पिटल माहीम (फोर्टीस असोशिएट)येथे केल्या गेल्या. यांच्यापैकी ९१थेट शस्त्रक्रिया होत्या तर ४१ मुलांवर कॅथ पद्धतीने उपचार झाले. या सगळ्या मुलांना त्यानंतर घरी सोडण्यात आले. ‘नबादत’ म्हणजेच‘हृदयाचा ठोका’ हे अत्यंत संयुक्तिक नाव असलेल्या या उपक्रमाद्वारे पुणे, सांगली,नंदुरबार, जळगाव, नागपूर, नाशिक, रायगड,सोलापूर, कोल्हापूर, गडचिरोली, नांदेड या महाराष्ट्रातील, तर गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमधील काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबांमधील मुलांना उपचारांचा फायदा घेता आला. या उपक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधी यांचे पाठबळ लाभले. या संस्थांनी राज्यांच्या कानाकोपऱ्यातून कार्डिअॅक शास्त्रीक्रीयेची आवश्यकता असलेली गरजू मुले शोधण्यात सहकार्य केले.एसएल रहेजा हॉस्पिटल माहीम ( फोर्टीस असोशिएट ) यांच्या कार्डिअॅक टीमचे नेतृत्वत्यांच्या पेडीयाट्रिक कार्डिअॅक आणि ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.विजय अगरवाल, पेडियाट्रिक कार्डिअॅक सर्जन आणि सल्लागार डॉ. द्वारकानाथ कुलकर्णी, आणि पेडियाट्रिक कार्डीयोलॉजीस्ट डॉ.भूषण चव्हाण आणि डॉ. शुभांगी उपाध्ये यांनी केले. फोर्टीस हॉस्पिटल मुलुंडच्या कार्डिअॅक टीमचे नेतृत्वपेडीयाट्रिक कार्डिअॅक सर्जन आणि सल्लागार डॉ. धनंजय मालणकर,सल्लागार पेडीयाट्रिक कार्डीयोलॉजीस्ट डॉ. स्वाती गरेकर, मुख्यपेडीयाट्रिक ऍनेस्थेटीस्ट आणि इंटेन्सिव्हीस्टडॉ. सचिन पाटील आणिपेडीयाट्रिक ऍनेस्थेटीस्ट आणि इंटेन्सिव्हीस्ट डॉ. शिवाजी माळीयांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!