
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघांच्या संपर्क नेतेपदी राज्याचे परिवहन मंत्री नामदार दिवाकर रावते यांची फेर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आज शिवसेना भवन मधून देण्यात आली आहे. परिवहन मंत्री नाम. दिवाकर रावते हे शिवसेनेचे अनुभवी नेते आहेत. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रात शिवसेना घराघरापर्यंत पोहचविण्यात ना. दिवाकर रावते यांचे मोठे योगदान आहे. विरोधी पक्षामध्ये काम करीत असताना ना. दिवाकर रावते यांनी विदर्भातील शेतकऱ्याच्या कापसाला हमी भाव मिळावा यासाठी पायी दिंडी काढून शासनास शेतकर्यांच्या कापसाला योग्य हमी भाव देण्यास भाग पाडले होते. सध्या शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांनी दिलेली परिवहन मंत्री पदाची जबाबदारी ते योग्य रीतीने सांभाळत असून, त्यांनी घेतलेल्या अनेक कौतुकास्पद निर्णयांनी एस.टी महामंडळाचा कारभार अत्यंत सुरळीत सुरु आहे. एस.टी. महामंडळाच्या शिवशाही गाडी सारखे त्यांचे उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. सन २००८ मध्ये त्यांची कोल्हापूर जिल्हा संपर्कनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर कट्टर शिवसैनिकांच्या साथीने आणि नियोजन कौशल्याच्या जोरावर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून तीन आमदार निवडून आले. एवढ्यावरच न थांबता तीनही आमदारांच्या साथीने कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे आणखी खोलवर रोवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्याचे फळ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदारांचे संख्याबळ दुप्पट होऊन शिवसेनेचे सहा आमदार विजयी झाले. यानंतर ना. दिवाकर रावते याची शिवसेना पश्चिम महाराष्ट्र नेते पदी नियुक्ती करण्यात आली होती. नाम. दिवाकर रावते यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष लक्ष असून, कोल्हापूरच्या विकासात फायदा ठरणारे सुमारे ३२५ कोटींचे बस पोर्ट त्यांनी मंजूर केले आहे. यासह दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून सौंदत्ती यात्रेस जाणाऱ्या भाविकांचा खोळंबा आकार आणि दर आदी बाबत वेळोवेळी जातीने लक्ष देवून भाविकाना स्वस्तात एस.टी सेवा देण्याचे काम नाम. दिवाकर रावते यांनी केले असून, नाम. दिवाकर रावते यांची शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते पदी पदावर फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a Reply