
प्रार्थना बेहेरे,आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी,अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.हॉस्टेल डेजची आठवण करुन देणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात १९९० चा काळ दाखवण्यात आलाय. साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. त्याकाळात हॉस्टेल ही संकल्पना नव्याने रुजू लागली होती. हे जग विद्यार्थ्यांसाठी नवं होतं. शिक्षणासाठी घरापासून दूर राहावं लागत असल्यामुळे कॉलेज हेच त्यांचं दुसरं घर बनलं होतं. शिवाय मोबाईल, इंटरनेट या गोष्टी नसल्यामुळे मित्रपरिवार घट्ट होता. मित्रमंडळींच्या सहवासातल्या काही हस-या आणि काही मनाला चटका लावणा-या आठवणींची गोष्ट म्हणजे ‘हॉस्टेल डेज’ हा सिनेमा.
१९९० चा काळ हा रोमॅण्टिक गाण्यांसाठी देखिल ओळखला जातो. त्यामुळे हॉस्टेल डेज सिनेमातूनही असाच सांगितीक नजराणा मिळणार आहे. या सिनेमात एकूण ८ गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक त्यासाठी एकत्र आले आहेत. हॉस्टेल डेजचंदिग्दर्शन आणि संगीत अजय नाईक यांनी केलंय.तेव्हा हॉस्टेल मधली ही जादुई दुनिया अनुभवायची असेल तर ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर पाहायला विसरु नका १२ ऑगस्टला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply