
स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’च्या सेटवर नुकतंच एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं ते या मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं. खरतर मालिकेमुळे कलाकार घरोघरी पोहोचत असतात. पण या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागच्या मंडळींचीही तेवढीच मेहनत असते. याच मेहनतीची दखल घेत ‘छोटी मालकीण’च्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन दादा गोडकर यांचा ६९वा वाढदिवस साजरा केला.
दादा गोडकर गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे. अनेक मराठी नाटकं आणि मराठी टेलिव्हिजनच्या अगदी सुरुवातीचा काळ त्यांनी जवळून पाहिलाय. त्यामुळे अनुभवाची भलीमोठी शिदोरी दादा यांच्या गाठीशी आहे.‘छोटी मालकीण’च्या सेटवरील कुटुंबाने केलेलं वाढदिवसाचं हे आगळंवेगळं सेलिब्रेशन पाहून दादा भारावून गेले होते.
‘दादा गोडकर म्हणजे उत्साहाचा अखंड झरा’ अश्या शब्दात गिरीश ओक यांनी दादांप्रती असणारी आपली भावना व्यक्त केली. दादांकडून खुप काही शिकण्यासारखं आहे. कामाप्रती असणारी त्यांची चिकाटी आम्हा कलाकारांना नेहमीच नवी प्रेरणा देत असते. त्यांना दीर्घायुष्य लाभो. अश्या शब्दात गिरीश ओक यांनी दादा यांना शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply