७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

कोल्हापूर : राज्याच्या महसूली उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विकासाला पैशाची कमतरता नाही, राज्याची तसेच जिल्ह्याची प्रगतीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र या प्रगतीबरोबरच समाजात सकारात्मक विचाराची सुरवात होणे गरजेचे असल्याचे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, महापौर शोभाताई बोंद्रे, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास आदीमान्‍यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुलाबपुष्प देवून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात विकास कामांना पैसा कमी पडणार नाही अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात जीएसटीमुळे गेल्यावर्षी 43 हजार कोटी रुपये जमा झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत जीएसटीमुळे 3 हजार कोटीचे उत्पन्न वाढले आहे तसेच मुद्रांक विभागामार्फत यंदा 26 हजार कोटीचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 हजार कोटींनी उत्पन्न वाढले आहे. 5 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते ते आता 22 हजार कि.मी. चे हाती घेतले असून ते अधिक दर्जेदार बनविण्याच्या कामास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात 2 हजार 32 कोटी रूपयांचे 870 कामे सुरू केली आहेत. मागील तीन वर्षात 698 कोटी 73 लाखाच्या निधीतून जवळपास 794 किमीच्या रस्त्यांची कामे केली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेततून 30 हजार किमीचे रस्ते चांगले केले आहेत.जिल्ह्यात 414 कोटीची कर्जमाफी शासनाने 34 हजार कोटीची क्रांतीकारी कर्जमाफी योजना राबवून राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना 16 हजार कोटीची कर्जमा 414 कोटी रुपये दिले. यामध्ये 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी शासन भरणार आहे. यासाठी सर्व महाविद्यालयामध्येही आता विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच मराठा समाजातील तरुण-तरुणींसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील 10 लाखापर्यंतच्या कर्जाची हमी राज्य शासनाने घेतली आहे. या कर्जावरील संपूर्ण व्याज शासन भरणार आहे.यावेळी शहीद जवान हवालदार अनंत जानबा धुरी यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लाखाची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेले सहाय्यक फौजदार दत्तात्रय बाबुराव मासाळ आणि पोलीस हवालदार वसंत शंकर पन्हाळकर यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवल्याबद्दल सिध्देश श्रीकांत कळेकर या विद्यार्थ्याचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेमधील राज्य गुणवत्ता यादीत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विराज अमृत कुरांडे, अद्वैत अरुण हळदकर, अर्थव बाबुराव चौगुले, रिची ऋतुराज यादव, रसिका रामदास वारके, श्रेया आशिष कांबळे या विद्यार्थी-विद्यार्थींनीचा सत्कार करण्यात आला तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेतंर्गत परिणीती प्रकाश शेलार हिच्या पालकांना 50 हजार रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, संदीप देसाई तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, पोलीस, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले. आभार नायब तहसिलदार प्रकाश दगडे यांनी मानले. सुत्रसंचालन श्री. सोनार यांनी केले. यावेळी युवा माहिती दूत उपक्रमाची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे प्रदर्शित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!