
कोल्हापूर: संपूर्ण जगात विविध आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याने जागतिक स्तरावर सुपरिचित असलेल्या संस्थेच्या चिन्मय मिशन कोल्हापूर शाखेमार्फत प्रथमच स्वामी स्वात्मानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर येथील चिन्मय गणाधिश आश्रम टोप- संभापुर येथे 8 व 9 सप्टेंबर रोजी दोन दिवसांचे निवासी युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा विषय “बदला स्वतःला जिंका जगाला” अशा स्वरूपाचा असून या शिबिरामध्ये संवाद चर्चासत्र गटचर्चा प्रात्याक्षिके राष्ट्रीय गीते ध्वनिफितीद्वारे विविध उपयुक्त विषयावरती भाषणांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात 15 ते 40 वयोगटातील युवक-युवती भाग घेऊ शकतात शिबिराचे प्रमुख स्वामी स्वात्मानंदजी जागतिक चिन्मय युवा केंद्राचे राष्ट्रीय संचालक असून त्यांनी आजपर्यंत अनेक युवा शिबिरे आणि उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उद्योगपतींना प्रभावी मार्गदर्शन केले आहे. त्याचप्रमाणे एक गीता जीवन आणि व्यवस्थापन यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. अशा प्रतिभावंत वक्त्याचे कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा रत्नागिरी येथील युवक युवतींना मार्गदर्शनाचा दुर्मिळ लाभ मिळणार आहे. या शिबिरामध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या युवक युवक युवतींनी चिन्मय पुष्पांजली प्रतिभा नगर मेन रोड येथे किंवा www.chinmaypushpanjali.com या संकेतस्थळावरून किंवा 91 46 49 19 60 या क्रमांकावर आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संचालक हस्मुखभाई शहा आणि ब्रह्मचैतन्य श्री अत्री चैतन्य यांनी पत्रकार परिषदेत केले. संबंधितांनी याचा लाभ घेऊन जीवनात परिवर्तन घडवावे असेही ते म्हणाले.
Leave a Reply