
कोल्हापुर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीचे मनपा नेहरूनगर विद्यामंदिर ही एक आदर्श हिरवी,ई-लर्निंग सुविधांची व उद्योगशील शाळा आहे.या शाळेची प्राथमिक विद्यार्थी संख्या ५७० व बालवाडी संख्या १५० आहे.ही महानगरपालिकेची २ नंबरची शाळा आहे.या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री सुधीर बाबुराव देसाई व उपाध्यक्षपदी पत्रकार श्रीमती श्रद्धा नारायण जोगळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.शाळेत झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.यावेळी नगरसेविका सौ. अस्विनी अरुण बारामते,मुख्याध्यापक श्री शहाजी कृष्णा घोरपडे गवस हुसेन मुलानी ,रामदास वास्कर ,सामाजिक कार्यकर्ते,अरुण बारामते, प्रितम यादव यांची उपस्थिती होती.
ईतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये मुख्यध्यापक शहाजी कृष्णा घोरपडे,नगरसेविका सौ.अस्विनी अरुण बारामते,महेश श्रीधर सावंत,दीपक अशोक कांबळे,विनायक विष्णू शिंदे,सौ.वहिदा महंमदेईसाक मोमीन,गवस हुसेन मुलानी,सौ.अस्विनी विश्वास दळवी,सौ.सुनीता पुंडलिक माने,कु.गिरीजा बसया मुगडलीमठ,प्रजेश राजेंद्र मिठारी आदींचा समावेश आहे. ही व्यवस्थापन समिती शाळा विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
Leave a Reply