धैर्या, ढुंग्या आणि कबीर ‘बॉईज २’ मध्येदेखील करणार दंगा 

 

गावाकडची धैर्या, ढुंग्या आणि शहरातला साधा सरळ कबीर यांची धम्मालगिरी आगामी ‘बॉईज २’ मध्येदेखील दिसून येणार आहे. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत,  अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँँच करण्यात आला. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ असे टॅॅगलाईन असलेल्या या पोस्टरवर ‘बॉईज’ सिनेमातील तीच अतरंगी पोरं आपल्याला दिसून येतायत. शाळेतून आता महाविद्यालयात गेलेल्या या तिघांच्या चेहऱ्यावर बुक्क्यांचा मार जरी दिसत असला तरी, त्यांची मस्ती अजून काही कमी झाली नसल्याचे, त्यांच्या हास्यातून कळून येते. विशाल देवरुखकर दिग्दर्शित या सिनेमातून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड, प्रेक्षकांसठी पुन्हा एकदा बॉइजगिरीचा डबल धमाका घेऊन येत आहेत. 

येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे संवादलेखन ऋषिकेश कोळीने लिहिले असून, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी ‘बॉईज २’ च्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. तसेच, इरॉस इंटरनेशनलद्वारे बॉईज २‘ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे. किशोरवयीन मुलांच्या गंमतीनंतर, महाविद्यालयीन जगात रमलेले हे बॉईज आता कोणती धम्माल घेऊन येत आहेत, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!