हिंदू संकृतीच्या जपणुकीसाठी जातीभेद बाजूला ठेवून सर्व हिंदू धर्मियांनी एकत्र यावे :आ.राजेश क्षीरसागर 

 
कोल्हापूर : हिंदू संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती आहे. हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील हा सर्वात मोठा व महत्त्वाचा धर्म असून, आजही अनेक जाती, वर्ण आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे सुखाने नांदत आहेत. हिंदू धर्माचे जगभरात साधारणपणे १ अब्ज हिंदू अनुयायी असून, हिंदू संकृतीच्या जपणुकीसाठी जातीभेद बाजूला ठेवून सर्व हिंदू धर्मियांनी श्रावण व्रतवैकल्य सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र यावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त सलग सहाव्या वर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी सायं.६.०० ते रात्री १०.०० या वेळेत “दैवज्ञ बोर्डिंग, मंगळवार पेठ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या श्रावण व्रतवैकल्या कार्यक्रमाकरिता कमलाकर किलकिले सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणले. शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे आमदार राजेश क्षीरसागर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोशध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या कावडीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने झाली. यानंतर गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत संकल्प यज्ञास सुरवात करण्यात आली. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित होते.  यानंतर मेघाताई बांभोरीकर यांचे मार्गदर्शनाने १०१ महिला या ठिकाणी रुद्र पठण करण्यात आले.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदू देवतांचे पूजन आणि आरती करण्यात आली. या कार्यक्रमावेळी एकाचवेळी १०८ जोडपी केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडला. यानंतर या कार्यक्रमाचा सुमारे पाच हजार हिंदू जणांनी लाभ घेतला. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनानी उपस्थित हिंदूजणांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत आले होते.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, हिंदू धर्मातील सणांची महती सर्वाना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता पाच वर्षांपूर्वी समस्त हिंदू धर्म संघटनाच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचे अनुकरण कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गावातही होऊ लागल्याने या उपक्रमाची सुरवात आपण केली याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचे स्वरूप या पेक्षाही मोठे होऊन संपूर्ण राज्यभरात श्रावण व्रत वैकल्य उपक्रम व्हावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पोतनीस, शहर अध्यक्ष अशोक रामचंदानी, गोरक्षाप्रमुख तुकाराम मांडवकर, शहरसह मंत्री सुधीर जोशी वंदूरकर, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बराले, आण्णा पोतदार, गजानन तोडकर, महादेव रामचंद्र यादव, हिंदू महासभेचे मनोज सोरप, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, सुधाकर सुतार, शरद माळी, हिंदू महासभेचे नंदू घोरपडे, शिवप्रतिष्ठानचे सुरेश यादव,  शिवसेनेचे किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, कमलाकर किलकिले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!