
कोल्हापूर : स्वातंत्र्यवीरांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा आणि जुन्या पिढीला त्याचा उजाळा व्हावा यासाठी कणेरी येथील सिद्धगिरी मठावर प्रेरणा पार्क हि संकल्पना साकारली आहे.एक हजार क्षमता असलेले प्रेक्षागृह ३ स्क्रीन असणारे भव्य थिएटर येथे उभारण्यात आले असल्याचे काडसिद्धेश्वर महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.४० मिनिटाचा लाइव शो येथे दाखविण्यात येणार आहे त्यात २५ ते ३० कलाकारांचा समवेश असणार आहे.सायंकाळी साडे सहा ते साडे आठ या वेळेत सुभाषचंद्र बोस,मदनलाल धिंग्रा,चाफेकर बंधू,स्वातंत्र्यवीर सावरकर,चंद्रशेखर आझाद यांच्यासह ज्या व्यक्ती स्वातंत्र्य लढ्यात धारातीर्थी पडल्या पण त्यांची फारशी माहिती नाही अशा स्वातंत्र्यविरांचा जीवनपट,१९४५ सालचा विद्रोह,महात्मा गांधी,मौलाना आझाद यांचेही काही जीवनप्रसंग यात दाखविले जाणार आहेत.शिवाय हा शो सुरु असताना ६० बाय ३० फुटाचा वाटर फाउंटन तयार करण्यात आला आहे.शोमधील प्रसंगाच्या आवाजाच्या चढ उतारानुसार यातील पाण्याचे आणि लाईट इफेक्टचे संयोजन करण्यात आले आहे.या प्रेरणा पार्कचे उद्घाटन येत्या २५ तारखेला ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भागात यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याच्या संजय दापके यांनी हे प्रेरणा पार्क साकारले आहे.तसेच सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची पुतळ्या द्वारे थीम तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक व्यक्तींच्या बलिदानाचा समावेश यापुढे करण्याचा मानस आहे.असेही काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितले. या प्रेरणा पार्क मुळे कोल्हापूरच्या पर्यटनास अजून चालना मिळणार आहे.तिकीट दर ५० रुपये तर शालेय विद्यार्थ्यांसाठी ५०% सवलत देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला अर्थ मुव्हर्स असोशिएशनचे भैय्या घोरपडे, एम.डी.पाटील,राजदीप सुर्वे,अभय देशपांडे,अमित हुक्केरीकर उपस्थित होते.
Leave a Reply