मधू जयंती इंटरनॅशनलतर्फे ग्राहकांसाठी ‘स्फूर्ती चहा’ सादर

 

कोल्हापूर:असे दिसून आले आहे की, बहुतेक भारतीयांना त्यांच्या सर्व दैनंदिन दिनचर्याचा आढावा त्यांच्या दैनंदिन कामाची सुरूवात करण्यासाठी चहातूनच ऊर्जा मिळते. अत्यंत आव्हानात्मक वातावरणात कठोर शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांच्या बाबतीत हे अधिक दिसून येते. केवळ शारीरिक ऊर्जेसाठी नव्हे, तर एकूणच प्रसन्न वाटण्यासाठी लोक चहा पितात. ग्राहकांची विचारप्रक्रिया सुरू राहण्यासाठीही काही वेळा अशा प्येयांची आवश्यकता भासते. भारतातील राज्या-राज्याप्रमाणे चहाची चव आणि ग्राहकांची रुची बदलत जाते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र आणि कर्नाटकात, जिथे स्फूर्ती चहा उपलब्ध होत आहे, तिथे दूध अधिक गाढ्या स्वरूपातच वापरले जाते. त्यामुळे या भागात उपलब्ध असलेल्या गाढ्यादुधाला साजेशी चव देणारा स्फूर्ती चहा तशाच खास पद्धतीने तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, अचूक सर्वेक्षणानुसारब्रँडने असे अनुमान लावले आहे की, ग्राहक अशाच एका चहाच्या शोधात आहेत, जो किफायतशीर असेल आणि त्यांना आवश्यक ती ऊर्जाही त्यांना या चहातून मिळू शकेल. स्फूर्ती या चहाच्या ब्रॅण्डमध्ये हेच आवश्यक गुणधर्म आहेत. या सर्वेक्षणानुसार, शहरी कृषी क्षेत्रातील निम शहरी ग्राहकांकडे आणि त्यांच्या स्वत: च्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या ग्राहकांना या ब्रॅण्डने आपले लक्ष्य केले आहे. प्रामुख्याने कृषी या प्राथमिक कौटुंबिक व्यवसायातून इतर दुय्यम आणि तृतीयांश व्यवसायांकडे वळलेल्या, स्थानिक प्रथांमध्ये रमलेल्या ग्राहकांना ऐतिहासिकरित्या चांगल्या प्रतीचे उत्पादन देण्यासाठी स्फूर्ती या ब्रॅण्डची निर्मिती करण्यात आली आहे. अशा लोकांच्या आयुष्यात कायमस्वरुपी बल घडवून आणण्यासाठी तसेच, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्फूर्ती जन्माला आला आहे.देशाच्या ग्रामीण भागातील लोकांच्या शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व या ब्रॅण्डला चांगलेच माहित आहे. म्हणूनच, स्फूर्ती हा ब्रॅण्ड ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर देणार आहे. यातूनच या लोकांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर, सदर ब्रॅण्ड स्थानिक क्रिडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्फूर्ती फाऊण्डेशन’ ही संस्था सादर करणार आहे. असे मानले जाते की समाजात क्रीडा उपक्रम राबवल्यामुळे एखाद्याला ताकद, प्रेरणा आणि शिस्त अंगी बाणता येतेआणि म्हणूनच हा समाज विकासाचा एक योग्य मार्ग असल्याचे दिसून आले आहे. स्फूर्ती हा ब्रॅण्ड आपल्या तत्वज्ञानासह या भागात क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणार आहे. कब्बडी, फूटबॉल, सायकलिंग आणि बोटिंगसारख्या स्थानिक खेळांना या संस्थेतर्फे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
मधू जयंती इंटरनॅशनल प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक सुमित शहा म्हणाले, “जगातल्या 42 पेक्षा जास्त देशांमध्ये आमच्या विविध पोर्टफोलिओसह, देशातील कन्झम्पशन पॅटर्न, व्यवहार खरेदी आणि देशभरातून क्षेत्रापर्यंत वेगवेगळ्या पॅलेटचे विश्लेषण करणे हा आम्हाला समृद्ध करणारा अनुभव आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि उत्तर कर्नाटक भागातील बेळगावसारख्या प्रदेशांतील बाजारपेठा स्फूर्तीसारख्या ब्रॅण्डसाठी फारच आशादायी असून या बाजारपेठा परवडण्याजोग्या आहेत. आमचा असा विश्वास आहे,की या ब्रॅण्डला त्याच्या लक्ष्य मार्केटशी संप्रेषण करण्याची एक मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ या प्रदेशांनाच नव्हे तर देशाला हा ब्रॅण्ड बांधून ठेवणार आहे. ही संधी म्हणजे येथील स्थानिक ‘क्रीडा’प्रकार होय. ताकद, उत्साह आणि प्रेरणा यासाठी ब्रॅण्डच्या तत्त्वज्ञानासह आम्ही आघाडी स्विकारली आहे.आम्ही एक आधार तयार करण्याचे नियोजन करीत आहोत,यामुळे एका निरोगी समाजाला प्रोत्साहन देता येईल.’’
 मधु जयंती इंटरनॅशनल सारख्या मोठ्या जागतिक कंपन्यांकडून येत असलेल्या स्फूर्ती या संभाव्य राष्ट्रीय ब्रॅण्डमधून सुनिश्चित होते की संबंधित ग्राहक सेगमेंटसाठी हा सर्वोत्तम अनुभव असू शकतो.मधू जयंती इंटरनॅशनल ही कंपनी जागतिक बाजारपेठेत चहा उत्पादन करण्यात अग्रेसर असून सोर्सिंग, ब्लेण्डिंग, पॅकेंजिंग, कस्टमायझिंग आणि निर्यात या बाबतीत ही अग्रेसर कंपनी आहे. ही कंपनी 42 देशांमध्ये विशेषतः युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपसारख्या देशांत अत्यंत यशस्वीरित्या हा ब्रॅण्ड कार्यरत आहे. भारतात मूल्यवर्धित पॅकेजच्या चहाचा हा एक अग्रगण्य निर्यातदार आणि पुरवठादार असून जगभरात अद्वितीय चहाच्या पॅलेट सेवा देऊ शकतो.मधू जयंती इंटरनॅशनल हा ब्रॅण्ड आतापर्यंत पूर्व रशिया आणि पश्चिम आफ्रिकेतील आपल्या उपस्थितीने प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर अत्यंत यशस्वी झाला आहे. भारतात, पॅकेट चहाच्या उत्पादनक्षेत्रात लालपान (कर्नाटक) आणि सरस्वती (महाराष्ट्र) या ब्रॅण्ड्सचा प्रादेशिक बाजारपेठेत मोठी भरभराट होताना दिसत आहे. टी इंडिया, गोल्ड बॉण्ड, व्हिक्टोरिया आणि टी-ए-मी हे मधू जयंतीचे काही सबब्रॅण्ड्स आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!