अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिनपिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसालाप्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीनचित्रपटाची घोषणा केली होती आणि खाससरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणूनघेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हेजाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे कीया चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीचहटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’ मध्येअभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिकासाकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पणप्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचेनवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय‘अशी ही आशिकी’अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बलपाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदादिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीतदिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजीयांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचारोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीनअनुभव ठरेल.गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असूनसहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीरसिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे याचित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यमठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमेआणि गाणी यांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुचीजाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजकप्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतूनअजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाचीनव्याने उजळणी करणार ‘अशी ही आशिकी’.